श्रीगोंदा नगरपरिषदेचा वाद थेट मुंबईपर्यंत....उपमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकांचा थेट मुख्याधिकाऱ्यांना फोन...!


प्रशासक न्यूज,दि.२६जून२०२६

श्रीगोंदा नगरपरिषदेत नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी शिवसेना (शिंदे गट)नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती सत्ताधारी पक्ष विरोधकांनी मांडलेल्या जनहिताच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत असून मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत या देखील सत्ताधाऱ्यांचे ऐकून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत शिवसेना नगरसेवकांनी नगरपरिषदेत जोरदार घोषणाबाजी करत सभेवर बहिष्कार टाकला होता तर विरोधकांची ही स्टंटबाजी असून महिला नगराध्यक्ष असताना सुद्धा त्यांच्यावर दबाव टाकण्याचा विरोधक प्रयत्न करत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजप ने केला होता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगलेला हा विरोधाचा सामना आता थेट मुंबईपर्यत गेला आहे
काल गुरुवारी रात्री दहा वाजता श्रीगोंद्यातील शिवसेनेच्या सर्व नऊ नगरसेवकांनी थेट मुंबई गाठत नगरविकास मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली श्रीगोंदा नगरपरिषदेत शिवसेना नगरसेवकांचे काम होत नसल्याची तक्रार यावेळी त्यांनी शिंदे यांच्याकडे केल्याची खात्रीशीर माहिती समजली आहे शिंदे यांनी देखील मी सर्व नगरसेवकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे राज्यात आपलं सरकार आहे तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही असे सांगत सर्व नगरसेवकांना भविष्यात ताकद देऊ असे सांगत आश्वस्थ केले आहे

श्रीगोंद्यातील शिवसेना नगरसेवकांनी या भेटीत श्रीगोंद्यात शिवसेनेचे ९ नगरसेवक असूनसुद्धा शिवसेनेचा स्वीकृत नगरसेवक न झाल्याबाबत आणि त्या प्रक्रियेत झालेल्या गोंधळाबाबत थेट शिंदे यांच्याकडे तक्रार केली तसेच नगरपरिषदेच्या मंडईच्या ठेकेदाराची कुठलीही थकहमी घेतलेली नाही मागील तीन वर्ष्यापासून त्याच्याकडे थकबाकी थकलेली आहे सदर ठेकेदार कुठल्याही अटी शर्थिंचे पालन करत नाही तरी सुद्धा त्याला मुदतवाढ का दिली गेली हा मुद्दा देखील नगरसेवकांनी काल उपस्थित केला 

तसेच श्रीगोंदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी या भाजपच्या सक्रिय सदस्य असल्या प्रमाणे वागत असून विरोधी नगरसेवकांची कामे त्या करत नसल्याची तक्रार या नगरसेवकांनी केली होती या सर्व प्रकाराची आणि नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी शिंदे यांच्या स्वीय सहायकांनी रात्री थेट श्रीगोंदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना फोन लावून या सर्व प्रकाराबाबत विचारणा करत त्यांची कान उघडणी केल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे

त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजप मध्ये श्रीगोंद्यात मात्र आता वादाची ठिणगी पडली असून स्थानिक पातळीवरचा वाद आता थेट पक्षाचे प्रमुख आणि राज्याच्या नेत्यांपर्यत गेल्यामुळे भविष्यात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत
सत्ताधारी आणि विरोधकांच्या या वादात श्रीगोंद्यातील नागरिकांच्या विकासा कडे मात्र दुर्लक्ष होऊ नये हीच श्रीगोंदेकर जनतेची अपेक्षा आहे

सदर प्रकरणी मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांची प्रतिक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही




श्रीगोंदा नगरपरिषदेचा वाद थेट मुंबईपर्यंत....उपमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकांचा थेट मुख्याधिकाऱ्यांना फोन...! श्रीगोंदा नगरपरिषदेचा वाद थेट मुंबईपर्यंत....उपमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकांचा थेट मुख्याधिकाऱ्यांना फोन...! Reviewed by Prashasak on जून २६, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.