श्रीगोंदा तालुक्यात "खाकीचे" जोरदार कमबॅक...ठेंगे,सोनवलकर जोडीचा कारवायांचा धडाका ..कायद्यात रहाल तरच... गुन्हेगारांना कडक ईशारा!
प्रशासक न्यूज,दि.२४जून २०२६
विशाल अ चव्हाण
श्रीगोंदा तालुक्यात मागील काही महिन्यांपासून घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना,तालुक्यात दोन पोलीस ठाणे असून सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न बघता तालुक्यात कायद्याचा धाक उरलाय का?असा सवाल श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या मनात उपस्थित झाला होता याचे मुख्य कारण म्हणजे 'बेलवंडी' आणि 'श्रीगोंद्याला' या आधी असलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांची निष्क्रिय कार्यपद्धती,पोलीस कारवाईचा मंदावलेला वेग,पोलीस खात्यातील वाढलेला भ्रष्टाचार आणि पोलीस आणि आरोपींचे जुळलेले आर्थिक हितसंबंध आणि त्यामुळे गुन्हेगारांचे वाढलेले मनोबल आणि कायद्याचा कमी झालेला धाक या सर्व परिस्थितीमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेचि भावना निर्माण झाली होती
परंतु काही महिन्यांपूर्वीच बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून सहायक पो निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी पदभार स्वीकारला आणि त्या भागात कारवायांचा धडाका सुरु केला चोरीच्या घडलेल्या घटनांचा तपास करत आरोपी अटक केले अनेक गुन्ह्यातील आरोपीना जेलची हवा खाऊ घातली रस्ता लूट करणारे आरोपी अटक करण्यापासून ते दरोडेखोरांची आंतरराज्य टोळी पकडण्या पर्यत बेलवंडी पोलिसांनी चांगली कामगिरी केलीत्यातच आता श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून राहुरी येथे कार्यरत असणारे संजय ठेंगे यांनी पदभार घेतला आहे ठेंगे यांनी राहूरी येथे जाण्याआधी बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून कामकाज पहिले होते त्या ठिकाणी अल्प कालावधीतच त्यांनी आपल्या कार्यपद्धतीमुळे जनमाणसात चांगली छाप पाडली होती अनेक गुन्ह्यातील दरोडेखोर जेरबंद करण्या सोबतच सामान्य लोकांमध्ये जाऊन काम केल्यामुळे ते त्या ठिकाणी लोकप्रिय ठरले होते त्याची बक्षीसी म्हणूनच त्यांना राहुरी सारख्या पोलीस स्टेशनला काम करण्याची संधी मिळाल्याचे बोलले जात होते त्या ठिकाणी सुद्धा ठेंगे यांनी उत्कृष्ट कामा मुळे राहुरी करांची मने जिंकली नुकत्याच त्यांच्या झालेल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला राहुरी करांनी केलेल्या मोठ्या गर्दीवरून त्याची प्रचिती आली
श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक म्हणून ठेंगे यांची नियुक्ती होताच त्यांच्या कामाच्या चर्चेमुळे श्रीगोंद्यातील जनतेच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला असून पदभार घेऊन आठ दिवस होत नाहीत तोच ठेंगे यांनी विना क्रमांकाच्या वाहनांवरील कारवाई,वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या जवळपास ३३६ वाहनानावर कारवाई करत एकूण ५लाख ७४ हजार ९०० रुपयांचा दंड मागील सात दिवसात वसूल केला आहे,पोलीस ठाण्यात विनाकारण येऊन गोंगाट करणाऱ्या लोकांवर लावलेला प्रतिबंध,पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या असलेल्या बेशिस्त वाहनांवर कारवाई करत पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा पोलीस स्टेशनच्या आवारात वाहने आणण्यास मनाई करत एक प्रकारे बेशिस्त वाहन पार्किंगला शिस्त लावली आहे ,अनेक गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेले फरार २१ आरोपीना एकाच वेळी अटक करून न्यायालयात हजर करण्याची केलेली कामगिरी,सोळा वर्ष्या पासून फरार असणाऱ्या आरोपीला अटक करण्याची केलेली कारवाई,पोलीस स्टेशनच्या आवरात येऊन गोंधळ करणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा ठेंगे यांनी उगारल्यामुळे पोलीस स्टेशनच्या आवारात विनाकारण होणारी गर्दी,दिवसभर सुरु असणारा गोंगाट कमी होऊन तिथे एक शिस्त लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तसेच पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदाराची तक्रार घेऊन त्यावर तात्काळ कारवाई करण्याची पो नि ठेंगे यांच्या कार्यपद्धती मुळे श्रीगोंद्यातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल एक विश्वास निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे त्यातच बेलवंडी व श्रीगोंदा पोलिसांनी भाईगिरी करणारे,दरोडेखोर,अनेक गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार यांना अटक करून त्यांना पोलीसी खाक्या दाखवत त्यांना बेड्या घालून शहरातून फिरवल्यामुळे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा चांगलाच धाक निर्माण झाला असून इथून पुढ कायद्यात राहील तोच फायद्यात राहील असाच एक प्रकारे ईशारा बेलवंडी आणि श्रीगोंदा पोलिसांनी आरोपीना दिला आहे बेलवंडी आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मिळून कारवायांचा सुरु केलेला धडाका पाहता श्रीगोंदा तालुक्यात खाकीची मलीन होत चाललेली प्रतिमा सुधारण्याची अपेक्षा जनतेत निर्माण झाली आहे फक्त पोलीस अधिकाऱ्यांनी यात सातत्य ठेवणे गरजेचे आहे
श्रीगोंदा तालुक्यात "खाकीचे" जोरदार कमबॅक...ठेंगे,सोनवलकर जोडीचा कारवायांचा धडाका ..कायद्यात रहाल तरच... गुन्हेगारांना कडक ईशारा!
Reviewed by Prashasak
on
जून २४, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
जून २४, २०२६
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: