प्रशासक न्यूज,दि.२१जून२०२६
रात्रीच्या वेळी लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यक्तीला तू इथे का थांबलास असे म्हणत त्याच्या गाडीतील २ लाख ४७ हजार रोख रक्कम चोरून नेल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी गावच्या शिवारात हॉटेल समर्थ येथे काल दि २० रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली
सदर घटनेबाबत बबन मल्हारी औटी रा.नांदा ता आष्टी जि बीड यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चार अनोळखी इसमांन विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहेसदर घटनेबाबत माहिती अशी की फिर्यादी औटी हे नगर पुणे रस्त्याने जात असताना काल रात्री.लघुशंकेसाठी रात्री दीड वाजण्याच्या वेळेस श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी शिवारातील समर्थ हॉटेल येथे थांबले असता त्याच वेळी तिथे चार अनोळखी व्यक्ती आल्या तू इथं का थांबलास असे म्हणत त्यांनी औटी यांना दमदाटी करुन धमकावले त्यांना मारहाण करत त्यांच्या गाडीतील २ लाख ४७ हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेत तिथून पळ काढला यानंतर घाबरलेल्या औटी यांनी त्याच रात्री उशिरा बेलवंडी पोलीस ठाणे गाठत घडल्या प्रकारा विषयी बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलीस पुढील तपास करत आहेत
'लघुशंकेसाठी' थांबणे पडले महागात...तू इथं का थांबला म्हणत...श्रीगोंदा तालुक्यातील घटना!
Reviewed by Prashasak
on
जून २१, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
जून २१, २०२६
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: