काही दिवसांपूर्वीच श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथून गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला बेलवंडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात दिवसेंदिवस होणारा अवैध शस्त्रांचा मुद्दा ऐरणीवर आला होता
त्यातच काल दि १९ रोजी बेलवंडी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी ढवळगाव गावच्या शिवारात केलेल्या कारवाईत एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस हस्तगत केले असून पोलिसांनी विनपरवाना गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी दीपक सीताराम शिंदे रा.ढवळगाव सचिन विलास शिंदे रा निबंवी या दोघांना ताब्यात घेतले असून सदर कट्टा व जिवंत काडतूसांबाबत चौकशी केली असता तुषार तांबे नामक व्यक्तीकडून आम्ही तो विक्री करण्यासाठी घेतल्याचे ताब्यात घेतलेल्या आरोपीनी सांगितले त्यावरून या तिघा जणांविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कायद्या नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहेसदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवालदार भाऊसाहेब यमगर, पोलीस हवालदार धर्मराज दहिफळे, पोलीस हवालदार संदीप गवारे, भाऊसाहेब शिंदे, पोलीस नाईक शरद गांगर्डे, पोलिस शिपाई कैलास शिपणकर, दादासाहेब क्षीरसागर , विकास सोनवणे, राजू भोर, होमगार्ड सचिन काळाने, राहुल दिघे, राहुल धायगुडे, राहुल मासाळ, विशाल पवार, हनुमंत खोमणे, यांनी केलेली आहे.
सदर घटने बाबत बेलवंडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काल दि १९ जून रोजी बेलवंडी पोलिसांना ढवळगाव गावच्या शिवरात गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती समजली होती त्यानुसार बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी आपल्या सहकारी पोलीस कर्मच्याऱ्यांसह श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव शिवारातील हॉटेल रिलॅक्स येथे सापळा लावला परंतु संशयित आरोपीना याबाबत चाहूल लागल्याने त्यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस पथकाने पळून जाणाऱ्या दोघा आरोपीना मोठ्या शिताफिने पाठलाग करत पकडले दोन्ही आरोपीची अंगझडती घेतली असता सचिन विलास शिंदे वय ३५ याच्याकडे विना परवाना गावठी कट्टा मिळून आला तर त्याचा साथीदार दीपक सीताराम शिंदे याच्याकडे दोन जिवंत काडतूस मिळून आले पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे
बेलवंडी पोलिसांनी काही महिन्यात दुसऱ्यांदा अश्या प्रकारे गावठी कट्टा पकडल्यामुळे बेलवंडी पोलिसांचे कौतुक होत असले तरी या निमित्ताने बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्रांची होणारी विक्री हा मुद्दा ऐरणीवर आला आहे
पुन्हा सापडला गावठी कट्टा! श्रीगोंदा तालुक्यात अवैध शस्त्रांची वाढती चिंता
Reviewed by Prashasak
on
जून २०, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
जून २०, २०२६
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: