प्रशासक न्यूज,दि.१८जून२०२६
श्रीगोंदा पोलीस ठाणे मागील काही दिवसांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आले आहे त्यामुळे श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नेमक चाललंय काय असा सवाल आता उपस्थित होत आहे
श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील दादा म्हस्के,नितीन गाडगे आणि राजेश जाधव नावाचे तीन कर्मचारी सात हजार रुपयांची लाच घेताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहेत आज दुपारी ही कारवाई करण्यात आली
एकाच वेळी तीन पोलीस लाच घेताना सापडण्याची ही श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या इतिहासातील बहुधा पहिलीच घटना म्हणावी लागेल
अपघाताच्या गुन्ह्यातील एका प्रकरणाची नोंद लावण्यासाठी १० हजार रुपयांची लाच या पोलिसांनी मागितली होती त्यातील सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज हे तीन लाचखोर पोलीस रंगेहाथ पकडले आहेत
मागील वर्षी श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी लाच घेताना सापडले होते त्यामुळे श्रीगोंदा पोलीस स्टेशनला भ्रष्टाचारची कीड किती मोठ्या प्रमाणात लागली हे दिसून येत आहे
एकाच वेळी अश्या प्रकारे तीन पोलीस कर्मचारी लाच घेताना सापडल्यामुळे श्रीगोंदा पोलीस स्टेशन सह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे
श्रीगोंद्यात पुन्हा खळबळ...एकाच वेळी तीन पोलीस कर्मचारी लाच घेताना पकडले!
Reviewed by Prashasak
on
जून १८, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
जून १८, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: