'चोरट्यांचा' हल्ला... पती-पत्नी गंभीर जखमी.. श्रीगोंदा तालुक्यातील घटना!


प्रशासक न्यूज,दि.११मे २०२६

रात्रीच्या वेळेस शेतात झोपलेले असताना चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव गावातील आठखांब मळा,गवळी वस्ती याठिकाणी दि.१० मे रोजी रात्री साडे अकरा ते दि.११मे रोजी रात्री १वाजण्याच्या दरम्यान घडली आहे

या हल्ल्यात दत्तात्रय गवळी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर त्यांच्या पत्नी कौशल्याबाई या देखील चोरट्यानी केलेल्या मारहाणीत जखमी झाल्या आहेत

हल्ला करणारे दोन अनोळखी चोर हे १८ ते २० वर्ष वयोगटातील असल्याची माहिती समजली आहे

या चोरट्यानी रात्रीच्या वेळी शेतात झोपलेल्या गवळी दाम्पत्याला काठी व लोखंडी हत्याराने मारहाण करीत कौशल्याबाई यांच्या गळ्यातील ७० हजार रु किंमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मनीमंगळसूत्र आणि कानातील दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे १५ हजार रु किंमतीची सोन्याचे कर्णफुले असा एकूण ८५हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे

सदर चोरीच्या घटनेबाबत गवळी यांचा मुलगा नवनाथ दत्तात्रय गवळी यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून दोन अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे आई वडील हे मागील दोन महिन्यांपासून भुईमुगाच्या शेतात झोपायला जात होते रात्री देखील ते शेतात झोपायला गेले असता १८ ते २०वर्षे वयोगटातील दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांचे वडील दत्तात्रय आणि आई कौशल्याबाई यांच्यावर हल्ला केला चोरट्यानी लोखंडी हत्याराने दत्तात्रय गवळी यांना जबर मारहाण केली या मारहाणीत ते बेशुद्ध झाले तर कौशल्याबाई यांना चोरट्यानी काठीने मारहाण करत जखमी केले आणि त्यांच्या गळ्यातील कानातील मुद्देमाल चोरून नेला त्यानंतर जखमी अवस्थेत कौशल्याबाई या जोर जोराने ओरडत त्यांच्या राहत्या घरी आल्या त्यानंतर फिर्यादी नवनाथ गवळी हे इतर लोकांना घेऊन घटनास्थळी गेले त्यानंतर त्या ठिकाणी बेशुद्ध आणि जखमी अवस्थेत पडलेल्या वडिलांना त्यांनी दवाखान्यात नेले

घटनेची माहिती समजल्यानंतर बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पो निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार कबाडी तसेच कर्जत पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे

सदर घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे
'चोरट्यांचा' हल्ला... पती-पत्नी गंभीर जखमी.. श्रीगोंदा तालुक्यातील घटना! 'चोरट्यांचा' हल्ला... पती-पत्नी गंभीर जखमी.. श्रीगोंदा तालुक्यातील घटना! Reviewed by Prashasak on मे ११, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.