तुलाच खूप समजतं का..असले प्रश्न मला विचारायचे नाहीत...खासदार भडकले...पत्रकारांकडून निषेध...माफी मागत नाहीत तोपर्यत बहिष्कार!


प्रशासक न्यूज,दि.३०एप्रिल २०२६

खासदार निलेश लंके यांनी दोन दिवसांपूर्वी श्रीगोंद्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचा राग मनात धरून काही पत्रकारांना अरेरावी ची भाषा वापरत तू असले प्रश्न विचारून स्वतःला खूप समजतं असं दाखवू नको मला असले प्रश्न परत विचारायचे नाही असे म्हणत पत्रकारांवर दबाव टाकत त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला होता त्या घटनेच्या निषेधार्थ आज श्रीगोंद्यातील पत्रकारांनी एकत्रित येत खा.लंके यांच्या त्या कृत्याचा जाहीर निषेध नोंदवत जोपर्यत लंके पत्रकारांची माफी मागत नाहीत झाल्या प्रकारावर दिलगिरी व्यक्त करत नाहीत तोपर्यत त्यांच्या बातम्यांवर बहिष्कार घालण्याचा तसेच त्यांच्या सर्व कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे

 याबाबतचे निवेदन संसदेचे अध्यक्ष ओम बिर्ला,पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठवण्यात आले असून त्याची प्रत श्रीगोंदा तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना देण्यात आली आहे
सदर निवेदनावर पत्रकार विशाल चव्हाण, अमोल झेंडे,दत्ताजी जगताप,माधव बनसूडे,दादा सोनवणे,गायत्री ढवळे,किशोर मचे,ज्ञानेश्वर येवले,सचिन शिंदे,नितीन रोही,सत्यवान शिंदे,सुहास कुलकर्णी,अमर घोडके,संदीप उमाप,विजय मांडे,सुभाष शिंदे,अंकुश शिंदे,गणेश कविटकर,विजयराव उंडे,शिवाजीराजे साळुंके,अनिल तुपे या पत्रकारांच्या सह्या आहेत

याबाबत सविस्तर माहिती अशी की दि २८ एप्रिल मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता श्रीगोंद्यातील हॉटेल ए स्टार येथे खासदार निलेश लंके यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती त्या ठिकाणी पत्रकारांनी त्यांना विकासकामा बाबत काही प्रश्न विचारले होते त्याचा राग मनात धरून पत्रकार परिषद झाल्यानंतर लंके यांनी पाथर्डी शेवगाव आणि इतर भागातले पत्रकार मला प्रश्न विचारत नाहीत तुम्ही श्रीगोंद्यातले पत्रकार खूपच प्रश्न विचारता तुम्हालाच एवढे प्रश्न का पडतात असे म्हणत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना बघून तू खूप प्रश्न विचारत होतास असे प्रश्न विचारून तुलाच खूप समजतं असं दाखवत जाऊ नकोस परत मला असे प्रश्न विचारायचे नाहीत असे म्हणत पत्रकारांना धमकावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काही पत्रकारांनी लंके यांना पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून रोखू नका असे समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तरी देखील लंके यांनी त्याला न जुमानता पत्रकारांना अरेरावी करत तिथून निघून गेले

या प्रकराबाबत श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांनी खा निलेश लंके यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत झाल्या प्रकाराबाबत ते जोपर्यत माफी मागत नाहीत तोपर्यत त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे





तुलाच खूप समजतं का..असले प्रश्न मला विचारायचे नाहीत...खासदार भडकले...पत्रकारांकडून निषेध...माफी मागत नाहीत तोपर्यत बहिष्कार! तुलाच खूप समजतं का..असले प्रश्न मला विचारायचे नाहीत...खासदार भडकले...पत्रकारांकडून निषेध...माफी मागत नाहीत तोपर्यत बहिष्कार! Reviewed by Prashasak on एप्रिल ३०, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.