रस्त्यात अचानक एक वाहन आडवे वळाल्यामुळे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आपल्या पत्नीसह दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या पतीचा अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे हरिश्चंद्र एकनाथराव पवार वय.४८,रा.करंजकल्ला ता.कळम जि.धाराशिव असे या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हॉटेल अनन्या जवळ श्रीगोंदा काष्टी रस्त्यावर हा अपघात झाला
अपघाता बाबत मिळालेली माहिती अशी की आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मयत हरीश्चंद्र पवार हे आपल्या पत्नीसह दुचाकीवरून त्यांच्या गावावरून रांजणगावगणपती या ठिकाणी कंपनीत कामाला जाण्यासाठी जात असताना श्रीगोंदा काष्टी रस्त्यावरील हॉटेल अनन्या जवळ त्यांची दुचाकी आली असता एक अज्ञात वाहन अचानक आडवे वळाल्यामुळे पवार यांची दुचाकी आणि काष्टीकडून श्रीगोंद्याकडे येणाऱ्या दुचाकीची समोरा समोर धडक झाली यात पवार दांपत्य गंभीर जखमी झाले तर समोरच्या दुचाकीवर ट्रिपल सीट असणारे तरुण किरकोळ जखमी झाले हे तरुण श्रीगोंद्यातीलच असल्याची माहिती समजली आहे अपघाता नंतर हॉटेल अनन्या चे मालक महेश शेंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच तेथील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्त लोकांना मदत केली
अपघाता बाबत पोलिसांना माहिती समजताच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पो हे कॉ आप्पा तरटे यांनी घटनास्थळी धाव घेतली पवार यांच्यावर श्रीगोंद्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीवर श्रीगोंद्यात उपचार सुरु आहेत
मयताचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे पुढील तपास पो हे कॉ आप्पा तरटे हे करत आहेत
अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत
श्रीगोंदा शहरानजीक अपघात...कामावर निघालेल्या पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी!
Reviewed by Prashasak
on
एप्रिल २५, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
एप्रिल २५, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: