"प्रशिक्षणातुन"शहराच्या विकासाला बळकटी मिळणार का?निसर्गरम्य वातावरणात नगरसेवक गिरवणार प्रशिक्षणाचे धडे..!
प्रशासक न्यूज,दि.२२एप्रिल२०२६
नगरसेवक म्हणून असलेल्या कर्तव्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय योजना,कायदेशीर जबाबदाऱ्या विकास कार्यक्रम आणि प्रशासकीय कार्यपद्धती यांची सखोल माहिती प्राप्त करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोणावळा येथे दि.२३एप्रिल ते दि.२५ एप्रिल २०२६ असे तीन दिवसीय नगरसेवक कार्यक्षमता प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
या प्रशिक्षण आणि प्रबोधन वर्गासाठी आज श्रीगोंद्यातील भाजपचे नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक कुटुंबासह लोणावळ्याला रवाना झाले आहेत
उद्यापासून पुढील तीन दिवस लोणावळ्यात निसर्गरम्य वातावरणात श्रीगोंद्यातील भाजपा नगरसेवक प्रशिक्षणाचे धडे गिरवणार आहेत प्रभागाच्या विकासासाठी नगरसेवकांचा हा मास्टरक्लास होत असून आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी श्रीगोंद्यातील भाजपा नगरसेवक पुढील तीन दिवस विद्यार्थी बनून प्रभावी कामकाजाचे प्रशिक्षण घेणार आहेत
या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे नगरसेवकांना आधुनिक प्रशासकीय तंत्र,कायदेशीर तरतुदी,वित्तीय नियोजन,जनसंपर्क कौशल्य आणि शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे यामुळे नगरसेवक आपल्या कार्यक्षेत्रात अधिक प्रभावीपणे काम करू शकतील नागरिकांच्या तक्रारीचे त्वरित निवारण करू शकतील आणि विकास कामाला गती देऊ शकतील या प्रशिक्षणा मुळे नगरसेवकांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या निर्णयक्षमतेत सुधारणा होईल असे भाजपा पक्षाचा या प्रशिक्षण कार्यक्रमा मागचा हेतू आहे
श्रीगोंदा शहराच्या विकासाला चालना मिळण्यासाठी मदत होणार का?
लोणावळा येथे भाजपने नगरसेवक नगराध्यक्ष यांच्यासाठी आयोजित केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे श्रीगोंदा शहराच्या विकासाला गती मिळणार का शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत होणार का?हे येणाऱ्या काळात समजणार आहे नगरसेवकांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्वपूर्ण असले तरी श्रीगोंदा शहराचा विकास होण्यासाठी या प्रशिक्षणाचा किती फायदा होतो भाजपा नगरसेवक श्रीगोंदेकरांचे प्रश्न कसे सोडवणार हे भविष्यात शहराचा विकास कसा आणि किती प्रमाणात होतो यावरूनच समजणार आहे
"प्रशिक्षणातुन"शहराच्या विकासाला बळकटी मिळणार का?निसर्गरम्य वातावरणात नगरसेवक गिरवणार प्रशिक्षणाचे धडे..!
Reviewed by Prashasak
on
एप्रिल २२, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
एप्रिल २२, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: