प्रशासक न्यूज,दि.१२एप्रिल२०२६
आपल्या नऊ वर्ष्याच्या मुलाला पोहायला शिकवत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वडिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण या गावात आज सकाळी दहा ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली असून गावातील काही तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पाण्यात बुडणाऱ्या नऊ वर्षीय मुलाला वाचवण्यात मात्र यश आले आहे अमित रंगनाथ साठे वय.४०असे पाण्यात बुडून मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे
घटनेबाबत गावातील काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून समजलेली माहिती अशी की अमित साठे हे त्यांचा चौथीत शिकणारा ९ वर्षीय मुलगा साहील याला पोहायला शिकवण्यासाठी गावातील नदीवरील केटी मधील पाण्यामधे घेऊन गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अमित साठे हे पाण्यात बुडाले.
घटनेदरम्यान साहील हाही पाण्यात बुडत होता. त्याच वेळी तेथून जात असलेल्या सुधीर धोत्रे या तरुणाने प्रसंगावधान राखत तात्काळ धाव घेतली आणि साहीलला सुरक्षित बाहेर काढले.नवनाथ जाधव या तरुणाने देखील बचावकार्यात मोठी मदत केली
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. सरपंच व स्थानिक नागरिकांनी घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली त्यानंतर रायगव्हाण येथील एकलव्य संघटनेच्या बचाव पथकाने शोधमोहीम राबवून अमित साठे यांचा मृतदेह बाहेर काढला.
या बचाव कार्यात काळू निकम, करण माळी, राहुल गायकवाड, बन्नी जाधव, दादू गायकवाड यांचा सहभाग होता. तसेच उद्योजक दौलत नाना शितोळे यांची डिसास्टर रिस्क्यू फोर्स व रांजणगाव एमआयडीसी येथील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते.
मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरूर येथे पाठविण्यात आला होता अश्या प्रकारे पोहायला शिकवणाऱ्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे गावात दुःखाचे वातावरण पसरले होते
'वडिलांचा' पाण्यात बुडून मृत्यू...तरुणांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि....
Reviewed by Prashasak
on
एप्रिल १२, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
एप्रिल १२, २०२६
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: