'उपोषण' मागे घेण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी...."त्या" कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप..महिलेचा थेट आत्मदहनाचा ईशारा...!
प्रशासक न्यूज,दि.१०एप्रिल२०२६
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याविरोधात सुरु केलेले उपोषण थांबवण्यासाठी उपोषणकर्त्या महिलेसह तिच्या घरच्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने दिल्याचा आरोप एका महिलेने केला असून आपल्याला त्रास देण्यासाठी हा पोलीस कर्मचारी आरोपींशी हातमिळवणी करत असल्याचा संशय देखील सदर महिलेने व्यक्त केला आहे तसेच या सर्व प्रकाराची चौकशी होऊन न्याय न मिळाल्यास दि.२०/०४/२०२६ रोजी पोलीस महासंचालकांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा ईशारा देखील या महिलेने पोलीस महासंचालकांकडे केलेल्या तक्रार अर्जात केला आहे
श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संदीप राऊत यांनी दि.२९मार्च २०२६ रोजी रात्री प्रेरणा लालासाहेब झेंडे यांना तू सुरु केलेले उपोषण मागे घेतले नाहीस तर तुझ्यासह घरच्यांवर खोटा गुन्हा दाखल करू अशी धमकी देत उपोषण मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप प्रेरणा झेंडे यांनी केला आहे झेंडे यांनी या प्रकरणाबाबत थेट पोलीस महासंचालकांकडेच अर्जाद्वारे तक्रार केली असून न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा ईशारा देखील दिला आहे तसेच संबंधित प्रकरणात श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांनी कुठलीच दखल घेतली नसून पोलीस निरीक्षक हे संदीप राऊत यांना वाचवण्यासाठी स्वतःचे पोलीस पुढे करून माझ्यावर खोट्या केसेस टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचा खळबळजनक आरोप देखील या अर्जात करण्यात आला आहे
प्रेरणा झेंडे यांनी पोलीस महासंचालकांना दिलेल्या अर्जात म्हंटले आहे की दि.२८ मार्च २०२६ रोजी त्या श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कंपनी चालक यांच्या ऑफिसमध्ये कर्जतला जात असल्याची माहिती देण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी पोलीस कर्मचारी संदीप राऊत यांनी विनाकारण माझ्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली हुज्जत घालताना राऊत हे दोनवेळा माझ्या अंगावर मारण्यासाठी धाऊन आले त्यानंतर राऊत यांनी पोलीस निरीक्षक यांना फोन करून ही पोलिसाला नडली हिच्यावर खोटी केस करा असे सांगितले त्यानंतर राऊत यांनी मोबाईल मध्ये माझा व्हिडीओ काढत तुझ्यावर गुन्हा दाखल करतो असे धमकावले त्यानंतर झेंडे यांनी लेखी स्वरूपात पत्र देऊन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आमरण उपोषण सुरु केले त्यानंतर पोलीस निरीक्षकांनी झेंडे यांना बोलावून घेऊन सत्य परिस्थिती जाणून घेत कारवाई करण्याचे तोंडी आश्वासन दिले त्यानंतर संदीप राऊत यांचे व प्रेरणा झेंडे यांचे मोबाईलमध्ये काढलेले व्हिडीओ डिलीट करण्यावरून पुन्हा वाद झाले त्यानंतर झेंडे यांनी पुन्हा उपोषण सुरु केले असता पोलीस कर्मचारी राऊत यांनी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत उपोषण मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप झेंडे यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केला आहे
पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला मी वैतागून गेले असून आपले काही बरे वाईट झाल्यास त्याला पोलीस कर्मचारी संदीप राऊत हे जबाबदार राहतील याची नोंद घेऊन सदर प्रकरणी न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा ईशारा प्रेरणा झेंडे यांनी दिला आहे
सदर प्रकाराबाबत पोलीस कर्मचारी संदीप राऊत यांचे मत जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला
कर्जत पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्याशी या प्रकरणी संपर्क साधत त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही
'उपोषण' मागे घेण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी...."त्या" कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप..महिलेचा थेट आत्मदहनाचा ईशारा...!
Reviewed by Prashasak
on
एप्रिल ०९, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
एप्रिल ०९, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: