प्रशासक न्यूज,दि.६एप्रिल२०२६
श्रीगोंदा तालुक्यात सध्या गुन्हेगारीचे पेव फुटल्याचे पाहायला मिळत आहे काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील काष्टी गावात एका हॉटेल मध्ये रात्रीच्या वेळेस किरकोळ कारणातून गोळीबार झाल्याची घटना घडली होती तेव्हापासून श्रीगोंदा तालुक्यात गावठी कट्ट्याचा शिरकाव झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता त्यातच आता बेलवंडी पोलिसांनी श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावात सरस्वती विद्यालयाच्या पाठीमागे राहणाऱ्या अशोक लक्ष्मण कराळे या व्यक्तीकडून गावठी कट्टट्याचे चार जिवंत काडतूस आणि त्याच्या राहत्या घरातून एक गावठी कट्टा आणि एक लोखंडी तलवार असा मुद्देमाल जप्त केला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीवर या आधी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत
दि ३एप्रिल २०२६ रोजी बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पो निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांना गोपनीय माहिती मिळाली की विसापूर येथे सरस्वती विद्यालयाच्या मागे राहणारा अशोक कराळे हा इसम देशी बनावटीचा कटटा (अग्नीशख)जिवंत काडतुसे बेकायदेशिर रित्या आपले कब्जात बाळगून फिरत आहे. त्यानंतर स पो नि सोनवलकर यांनी लगेच तपास पथकास सदर आरोपीचा शोध घेवून खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने, तपास पथकाने रवाना होवुन सदर आरोपीचा शोध घेतला असता विसापुर येथील सरस्वती विदयालयाच्या मागे पोलिसांना एक संशयीत इसम फिरताना आणि संशयित नजरेने आजुबाजुला टेहाळणी करत उभा असल्याचे दिसला.पोलिसांनी त्याला नाव विचारले असता तो इसम अशोक कराळे असल्याचे पोलिसांना समजले त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेवुन त्यास पोलीसांची व पंचाची ओळख करुन देवून त्यास अंगझडतीचा उदेश सांगुन दोन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली पोलिसांना अंगझडतीमध्ये सदर इसमाच्या पॅन्टच्या खिशात देशी बनावटीच्या गावठी कटटयाचे ४ जिवंत काडतुसे मिळुन आली. पोलिसांनी परवान्या बाबत विचारपुस करता त्याने परवाना नसल्याचे सांगितले तसेच सदर जिवंत काडतुसा बरोबर असलेल्या गावठी कटटयाबाबत विचारपुस केली असता, त्याने काही एक माहिती न सांगितल्याने सदर इसमाचे घराची घरझडती घेतली असता, त्याचे घरात दिवाणाखाली एक लोखंडी तलवार मिळून आली. त्यानंतर पोलिसांनी कराळे याला अटक करुन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता सदर आरोपीने त्याच्या घरातुन पोलिसांना एक गावठी कटटा (पिस्तुल)त्याचे बटवर दोन्ही बाजुन काळया रंगाचे पटटे असलेला व त्यास खाली मॅगझीन असलेली असा गावठी कटटा पोलिसांना काढून दिला पोलिसांनी तो कट्टा जप्त केला आहे आरोपी नामे- अशोक लक्ष्मण कराळे रा. विसापुर ता-श्रीगोंदा जि-अहिल्यानगर हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुदध यापुर्वी अहिल्यानगर या जिल्हयांमध्ये खालील गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबमे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणकुमार लोखंडे कर्जत विभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे, पो.हे. कॉ भाडुसाहेब यमगर, पो.हे.कॉ रविंद्र औटी, पो.हे. कॉ भाऊसाहेब शिंदे, पोना/शरद गांगर्ड, पोकों/ विनोद पवार, पोकों/दादासाहेब क्षिरसागर, पोकों/ रवि जाधव, पोकों/भापकर यांनी केली असुन दाखल गुन्हयांचा अधिक तपास हा सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे हे करत आहेत.
गावठी कट्टा,तलवार आणि जिवंत काडतूसांसह एकजण पकडला...श्रीगोंदा तालुक्यातील या भागात कारवाई..!
Reviewed by Prashasak
on
एप्रिल ०६, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
एप्रिल ०६, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: