प्रशासक न्यूज, दि.१७मे २०२६
'एल निनो' च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईच्या परिस्थितीत अनेक पाणी साठे आरक्षित करण्यात आलेले असताना देखील श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या आग्रही मागणीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यम मार्ग काढत मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २५ मे २०२६ रोजी जलसंपदा विभागाने कुकडी धरणातून उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे श्रीगोंदा तालुक्यातील लाभक्षेत्रातील पिकांना आणि पिण्याच्या पाण्याला मोठा आधार मिळणार आहे.अशी माहिती आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
सध्या कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये सुमारे १७.६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. हा उपलब्ध साठा कमी असला, तरी कडक उन्हाळा आणि पिकांची गरज लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार पाचपुते यांनी कुकडीचे आवर्तन सोडण्याच्या महत्वपूर्ण निर्णयासाठी तसेच घोड्चे आवर्तनाचे चांगल्या पद्धतीने नियोजन झाल्यामुळे मुख्यमंत्री तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांचे विशेष आभार मानले.
तसेच आमदार पाचपुते यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे कि पाणीसाठा मर्यादित असल्याने आवर्तनाचे पाणी वाया न घालवता पाणी काटकसरीने वापरावे तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासकीय नियमांचे पालन करावे.
२५ मे ला कुकडीचे आवर्तन सुटणार.. आमदार पाचपुते यांची माहिती
Reviewed by Prashasak
on
मे १७, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
मे १७, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: