'बेलवंडी' पोलिसांची श्रीगोंदा हद्दीत तर 'श्रीगोंदा' पोलिसांची बेलवंडी हद्दीत कारवाई


प्रशासक न्यूज,दि.१७मे २०२६

जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि त्यांच्या आदेशानुसार काल दि.१६ रोजी रात्री श्रीगोंदा तालुक्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली

परंतु ही कारवाई एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली ती म्हणजे बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्डयावर श्रीगोंदा पोलिसांनी तर श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी सुरु असलेल्या अवैध गुटखा विक्री आणि वाहतूक यावर बेलवंडी पोलिसांनी केलेली कारवाई या मुळे ही कारवाई चर्चेत आली आहे

काल रात्रीच्या सुमारास बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिसोरे बु.या गावातील बंद पडलेल्या एका गुऱ्हाळाच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि त्यांच्या पथकाने छापा टाकत एकूण ३२लाख ५७हजार ८००रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यामध्ये ७६,८००रु रोख रक्कम,५लाख ११हजार रु किंमतीचे मोबाईल,४लाख रु किंमतीच्या ६ दुचाकी,२२लाख रु किंमतीची २ चारचाकी वाहने,७०हजार रु किमतीचा लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला आहे भरत काळे,बापू काळे,नवनाथ जाधव तिघे रा.हंगेवाडी,संजय कांबळे, विनोद गावडे, नवनाथ सांगळे,निलेश धावडे,नवनाथ देवकर सर्व रा येळपणे,प्रशांत लबडे रा बेलवंडी,युवराज इथापे रा लोणीव्यँकनाथ या दहा जणांविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून यातील आठ जणांना ताब्यात घेतले असून दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत


तर बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पो निरीक्षक नंदकुमार सोनवलकर आणि त्यांच्या पथकाने काल सायंकाळी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आढळगाव आणि लोणीव्यँकनाथ या ठिकाणी कारवाई करत ४लाख ४०हजार२९६ रु किंमतीचा गुटखा व पानमसाला,२२लाख रु किमतीच्या एक क्रियेटा कार,टोयोटा ग्लाजा,एक मारुती सुझुकीची कॅरी गाडी असा एकूण २६लाख ४०हजार २९६ रु किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे
या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून तिघे जण फरार झाले आहेत
शरद सीताराम वडवकर रा. लोणीव्यँकनाथ आणि नागेश नीळकंठ सुमकवर रा झेंडा चौक श्रीगोंदा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत तर गुटखा विक्रीतील मुख्य सूत्रधार असलेले रवी बबन दळवी,अक्षय राजू होले,आणि प्रवीण गायकवाड हे तिघे फरार झाले आहेत




'बेलवंडी' पोलिसांची श्रीगोंदा हद्दीत तर 'श्रीगोंदा' पोलिसांची बेलवंडी हद्दीत कारवाई 'बेलवंडी' पोलिसांची श्रीगोंदा हद्दीत तर 'श्रीगोंदा' पोलिसांची बेलवंडी हद्दीत कारवाई Reviewed by Prashasak on मे १७, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.