"एसपींचा" अविश्वास कश्यामुळे?! कारवाई साठी थेट पोलीस प्रमुखांना लक्ष घालण्याची वेळ...'प्रभारींच्या' कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?


प्रशासक न्यूज,दि.१७मे२०२६

श्रीगोंदा तालुक्यातील वाढता गुन्हेगारीचा आलेख तालुक्याचे मोठे क्षेत्रफळ फोफावलेले अवैध धंदे, गुन्हेगारांची वाढलेली संख्या या सर्व गोष्टींचा विचार करून श्रीगोंदा तालुक्यात बेलवंडी पोलीस स्टेशनची नव्याने निर्मिती करण्यात आली परंतु गुन्हेगारीला आळा बसण्या ऐवजी ती जास्तच फोफावत चालल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे

श्रीगोंदा आणि बेलवंडी असे दोन पोलीस ठाणे तालुक्यात अस्तित्वात असून सुद्धा या ठिकाणी कारवाई करण्यासाठी थेट पोलीस अधीक्षकांना हस्तक्षेप करावा लागतो हे विशेष आणि पोलीस अधिक्षकांना तालुक्यातील अवैध व्यवसायांची माहिती समजते पण दोन्ही पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना ती समजतं नाही हे विशेष आणि त्यावर कारवाई करण्यासाठी थेट जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना दोन्ही पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश देऊन एकमेकांच्या हद्दीत कारवाई करण्यास सांगावे लागते ही त्यावरून विशेष बाब म्हणावी लागेल

असं म्हंटल जात की,पोलिसांच्या मर्जीशिवाय त्यांच्या हद्दीतुन साधी एक चप्पल सुद्धा चोरीला जावू शकत नाही मग आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध व्यवसायांबाबत बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना खरच माहिती नव्हती का? की अर्थपूर्ण तडजोडीने या धंद्याना पोलिसांकडूनच मुकसंमती दिली जाते हाही प्रश्न या कारवाई मुळे उपस्थित होत आहे

पोलीस अधीक्षकांचाच आपल्या अधिकाऱ्यांवर विश्वास राहिला नाही का?
काल रात्री पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशाने बेलवंडी पोलिसांची श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर श्रीगोंदा पोलिसांची बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कारवाई वरून पोलीस अधीक्षकांचाच आपल्या अधिकाऱ्यांवर विश्वास राहिलेला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे ज्याच्या हद्दीत जो अवैध प्रकार चालू आहे त्यावर कारवाईसाठी दुसऱ्या हद्दीतील अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाठवले जाणे हा त्याच अविश्वासाचा एक भाग म्हणावा लागेल ज्या हद्दीत अवैध व्यवसाय किंवा अवैध प्रकार सुरु आहे त्याच भागातील पोलीस अधिकाऱ्याला कारवाई साठी पोलीस अधीक्षकांनी का पाठवले नाही? तसे केल्यास कारवाई यशस्वी होणार नाही अशी शंका पोलीस अधीक्षकांना होती का?असा सवाल देखील या कारवाई मुळे उपस्थित झाला आहे जर पोलीस प्रमुखांनाच आपल्या अधिकाऱ्यांबाबत विश्वास वाटत नसेल तर सामान्य जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा आणि न्यायाची अपेक्षा करायची तरी कुणाकडून काल झालेल्या कारवाईमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत
 
अधिकारी कश्या पद्धतीने आर्थिक फायद्यासाठी म्यानेज होतात किंवा प्रभारी अधिकाऱ्यांचेच लक्ष्मी दर्शनासाठी आपल्या हद्दीत अश्या धंद्याना पाठबळ असते याची कल्पना कदाचित पोलीस अधीक्षकांना आली असावी म्हणून कारवाई साठी अधिकाऱ्यांची अशी हद्द बदल करण्याची गरज त्यांना वाटली असावी

*पोलीस अधिकाऱ्यांची पोलखोल...*
काल रात्री पोलीस अधिक्षकांना श्रीगोंदा तालुक्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसायाबाबत गोपनीय माहिती मिळाली आणि त्यानुसार त्यांनी कारवाई यशस्वी होण्यासाठी नवी शक्कल लढवत हद्द बदलून पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई साठी पाठवले आणि कारवाई यशस्वी झाली त्या कारवाईतून बेलवंडी पोलीस आणि श्रीगोंदा पोलिस अधिकाऱ्यांच्या कामकाजाची पोलखोल झाली आहे त्यांच्या हद्दीत सुरु असलेल्या या व्यवसायांची त्यांना माहिती नव्हती का? होती तर मग कारवाई का केली नाही असे प्रश्न सामान्य जनतेला पडले आहेत

 कालच्या घटनेमुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत ची विश्वासहार्ता देखील कमी झाली आहे किरकोळ कारवाईसाठी जर थेट पोलीस अधीक्षकांना सांगावे लागत असेल त्यांना लक्ष घालावे लागत असेल तर मग स्थानिक प्रभारी अधिकारी नेमके करतात तरी काय याबाबत ही साशंकता निर्माण झाली आहे

पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आणि आर्थिक हव्यासा पोटी कारवाईत होणारी टाळाटाळ या मुळे दिवसेंदिवस पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत असून ती सुधारण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यपद्धती मध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे

"एसपींचा" अविश्वास कश्यामुळे?! कारवाई साठी थेट पोलीस प्रमुखांना लक्ष घालण्याची वेळ...'प्रभारींच्या' कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? "एसपींचा" अविश्वास कश्यामुळे?! कारवाई साठी थेट पोलीस प्रमुखांना लक्ष घालण्याची वेळ...'प्रभारींच्या' कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? Reviewed by Prashasak on मे १७, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.