प्रशासक न्यूज,दि.१६जानेवारी२०२५
समाजात संविधानाने सर्व नागरिक महिला यांना समान अधिकार दिलेले असताना सुद्धा आजही विधवा महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते त्या विधवा आहेत म्हणून इतर महिलांकडून त्यांना सणासुदी च्या वेळी किंवा इतर आनंदाच्या कार्यक्रमात सापत्न पणाची वागणूक दिली जाते समाजातील ही दुष्ट प्रथा मोडून काढत विधवा स्त्रिया देखील स्त्रियाच असून त्यांना सुद्धा इतर महिलां प्रमाणे समान दर्जाची वागणूक मिळावी यासाठी श्रीगोंद्याच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ चांदणी ताई खेतमाळीस आणि महापुरुषांच्या विचारांवर प्रबोधन करणाऱ्या व्याख्यात्या सौ सुनीता दरवडे यांनी पुढाकार घेत श्रीगोंद्यात मकरसंक्रांतीच्या दिवशी एक अनोखा उपक्रम राबवला त्या स्तुत्य उपक्रमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे
सौभाग्यवती आणि विधवा अश्या प्रकारे स्त्रियांमध्ये कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेली सामाजिक भेदभावाची रेषा पुसण्याचे काम या दोन महिलांनी केले असून मकरसंक्रांतीच्या दिवशी त्यांनी विधवा महिलांना इतर सुवासीन महिलां प्रमाणे हळदी कुंकू लावत सर्व गोष्टीत समान वागणूक देत मान सन्मान दिला यामुळे विधवा महिलांनी आनंद व्यक्त करत दोघींना धन्यवाद दिले आहेत आम्हाला सौ खेतमाळीस आणि सौ दरवडे यांच्यामुळे इतर महिलां प्रमाणे सणाचा आनंद घेता आला याबाबत समाधान व्यक्त केले
या परिवर्तनाच्या कौतुकास्पद उपक्रमात सौ.सुनिता कोथिंबीरे,सौ.अंजली माने,सौ.जयश्री औटी,सौ.सुनंदा जायकर यांनी मोलाची साथ दिली.
"नगरसेविका" आणि "व्याख्याता" महिलेचा स्तुत्य उपक्रम...!
Reviewed by Prashasak
on
जानेवारी १६, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
जानेवारी १६, २०२६
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: