प्रशासक न्यूज,दि.१६जानेवारी२०२६
श्रीगोंदा शहरातील एका तरुणाला त्याचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपीना श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे
सदर घटने बाबत श्रीगोंदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव आसाराम खेंडके यांनी फिर्याद दिली होती कि १जानेवारी २०२६ पासून एक अज्ञात इसम मोबाईल क्रं ८४२२८६०७३२ या नंबर वरून व्हाट्सऍप ला म्यासेज करून खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन २०लाख रुपयांची खंडणी फिर्यादी यांच्याकडे मागत होता फिर्यादीने पूर्ण रक्कम न देता दीड लाख रुपये या धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाला दिले होते त्यानंतर धमकी देणाऱ्या इसमाला फिर्यादीने पूर्ण रक्कम न दिल्याचा राग आल्यामुळे त्याने पुन्हा फिर्यादीला म्यासेज करून तू जर खंडणी चे पूर्ण पैसे दिले नाहीस तर तुझे खासगी फोटो व्हायरल करून तुला किंवा तुझ्या घरातील कोणालाही दिसेल तिथे जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली या फिर्यादीनुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी दोन तपास पथके तयार करून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा तांत्रिक तपास करत शोध घेतला असता धमकी देणारा मोबाईल क्रमांक हा आकाश पोपट मोरे रा.टाकळी लोणार याचा असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने मोरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा हा त्याचे साथीदार बापू विठ्ठल शिंदे,किरण विठ्ठल शिंदे रा वडाळी रोड यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली त्यानुसार पोलिसांनी या तिन्ही आरोपीना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने तिघांना २० जानेवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे
पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली तीन चारचाकी वाहने आणि तीन मोबाईल फोन असा एकूण ५४लाख८०हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर गुन्ह्यात आणखी आरोपी आणि वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे
"खंडणीखोरांना" पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...'या' गोष्टीसाठी धमकी देत मागितली होती २०लाखांची खंडणी!
Reviewed by Prashasak
on
जानेवारी १६, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
जानेवारी १६, २०२६
Rating:



कोणत्याही टिप्पण्या नाहीत: