"मंदिरात" प्रवेश करत थेट....श्रीगोंदा तालुक्यातील घटना!


प्रशासक न्यूज,दि.१३जानेवारी२०२५

श्रीगोंदा तालुक्यात चोरी,घरफोडी या घटना सर्रास घडतं असतात परंतु मागील काही दिवसात घडणाऱ्या चोरीच्या घटनानवरून मंदिरातील देव सुद्धा आता सुरक्षित नसल्याचे पहायला मिळत आहे

श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दु या गावात काल दि.१२ रोजी रात्री नऊ ते आज दि १३ रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान गावातील मंदिरात चोरीची घटना घडली असून यात मंदिरातील १,४८,०००रु किंमतीचा १.८७३कि लो ग्रॅम वजनाचा महादेवाच्या प्रतिकृतीचा चांदीचा मुखवटा चोरट्यानी चोरून नेल्याची घटना घडली आहे

या चोरीबाबत दत्तात्रय वाखारे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वरील वेळेस चोरट्याने मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करत सदर देवाचा मुखवटा चोरून नेला आहे या घटनेमुळे हिंगणी गावात तीव्र संतापाची लाट असून चोरटे लवकर जेरबंद करून चोरीला गेलेला मुखवटा तात्काळ परत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे


सदर घटनास्थळी गुन्हे शाखेच्या पथकाने जाऊन पाहणी करत तपासाला सुरुवात केली असून लवकरच चोरटे जेरबंद केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे
"मंदिरात" प्रवेश करत थेट....श्रीगोंदा तालुक्यातील घटना! "मंदिरात" प्रवेश करत थेट....श्रीगोंदा तालुक्यातील घटना! Reviewed by Prashasak on जानेवारी १३, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.