"गळफास" घेतलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह...पोलिसांचे आवाहन..!


प्रशासक न्यूज,दि.१९जानेवारी२०२५

श्रीगोंदा तालुक्यातील चिखली घाटातील वनविभागाच्या मोकळ्या जागेत गळफास घेतलेल्या अवस्थेत एका अंदाजे वय ४०ते४५ वर्षे असलेल्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे

सदर महिलेचा रंग गोरा उंची अंदाजे पाच फूट चेहेरा गोल असून अंगात गुलाबी रंगाची साडी गुलाबी रंगाचा ब्लाऊज असून गळ्यात तुळशीची माळ आहे सदर मयत महिला ही तीन चार दिवसांपासून चिखली रोडवर फिरताना लोकांनी पाहिले आहे तरी या महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास बेलवंडी पोलिसांशी फोन क्रं..(०२४८७)२५०२३३३ आणि मो क्रं..९८९०३२७०७२ आणि ८८५७८८२२५५या क्रमांका वर संपर्क करण्याचे आवाहन बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पो निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी केले आहे

सदर महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला असला तरी या महिलेने आत्महत्या केली कि तिचा घातपात झाला हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे सदर अनोळखी महिलेच्या मृत्युबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे
"गळफास" घेतलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह...पोलिसांचे आवाहन..! "गळफास" घेतलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह...पोलिसांचे आवाहन..! Reviewed by Prashasak on जानेवारी १९, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.