प्रशासक न्यूज,दि.11जानेवारी 2025
श्रीगोंद्याला खमक्या नगराध्यक्ष लाभल्या आहेत त्यांनी आज पहिलंच भाषण केल असं समजलं पण त्यांनी पहिल्याच भाषणातून झलक दाखवून दिली असे गौरवोदगार काढत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीगोंद्याच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांचे कौतुक करत श्रीगोंदा शहर आणी तालुक्याचा चेहेरा मोहोरा बदलण्याची जबाबदारी माझी असून आमदार विक्रम पाचपुते यांच्या मागे संपूर्ण ताकद उभी करू अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली
मंत्री विखे आज श्रीगोंदा शहराच्या दौऱ्यावर आले होते त्यांच्या हस्ते शहरातील साडे आठ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलाचे उदघाट्न करण्यात आले त्यानंतर कुकडी कार्यालयातील शासकीय विश्रामगृहाची पाहणी करत माऊली निवासस्थानी अधिकाऱ्यानाची शासकीय आढावा बैठक नामदार विखे यांनी घेतली आणि त्यानंतर सायंकाळी शहरातील शेख महंमद महाराज मंदिर प्रांगणात भाजप च्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांचा नागरी सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विखे बोलत होते
लाडक्या बहिण या योजनेमुळे चित्र पालटले आणि भाजपला विक्रमी बहुमत मिळाल्याचे त्यांनी सांगितले*जिरवा जिरवीत आमचीच जिरली*
राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी काही डावपेच करावे लागतात एकमेकांची जिरवा जिरवी करावी लागते पण असे करत असताना आमचीच जिरली अशी कबुली विखे यांनी देत विरोधकांच्या फेक नेरीटिव्ह मुळे आणि कांदा,दूध कुकडी पाणी प्रश्न यामुळे सुजय विखे यांचा पराभव झाल्याचे सांगितले
*तालुक्याचा अनुभव वाईट भामटे आणि महाभाग..*
श्रीगोंदा तालुक्याचा मला खूप वाईट अनुभव आला आहे काही फक्त पट्टीतले बोलणारे महाभाग आहेत फसवण्याची त्यांची मानसिकता आहे मला अंधारात येऊन भेटतात एक नंबरचे भामटे माणसं तालुक्यात आहेत असं सांगत लोणीव्यंकनाथ चा फार वाईट अनुभव आल्याचे सांगताच उपस्थिता मध्ये एकच हश्या पिकला
*पन्नास वर्षे कुकडीच्या पाण्याची काळजी राहणार नाही*
भविष्यात पन्नास वर्षे शेतकऱ्यांना कुकडीच्या पाण्याची काळजी राहणार नाही इतिहासात नोंद होईल असे काम करणार असून कुकडीचे पाणी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही देत अस्तरीकर नाला साडेचारशे कोटी रुपये दिल्याचे विखे यांनी सांगितले*एक महिन्यात साकळाई चे भूमिपूजन*
मी जलसंपदा मंत्री झालो नसतो तर साकळाई योजना झाली नसती योजनेसाठी सर्व मंजूरी भेटल्या आहेत बाराशे कोटी मंजूर केले असून एक महिन्यात साकळाई च्या कामाचे भूमिपूजन करणार असल्याचे विखे यांनी सांगितले
*एमआयडीसी च्या आशा पल्लवीत*
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे एमआयडीसी साठी सहाशे एकर जमीन दिली आहे पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन या ठिकाणी लवकरात लवकर उद्योग सुरु करण्याचे आश्वासन आज विखे यांनी दिल्यामुळे श्रीगोंदेकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत
तसेच जलसंपदा मंत्री विखे यांनी शहरातील सरस्वती नदीचे सुशोभीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आज दिल्या
यावेळी बोलताना आ विक्रम पाचपुते यांनी विरोधकांकडून निवडणुका होऊन गेल्यावर जातीच्या राजकारणाचे विष लोकांच्या मनात पेरले जात आहे त्यांचा हा विषप्रयोग आम्ही मोडून काढू असे सांगत श्रीगोंद्याला कुकडीच्या पाण्यासाठी कायम पुणे करांसोबत संघर्ष करावा लागत होता परंतु आता विखे मंत्री झाल्यामुळे तो संघर्ष संपला आहे असे सांगतानाच डिभे माणिकडोह बोगद्याची मागणी त्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आपला मुलगा आपल्या पेक्षा पुढे गेला याचा आनंद असल्याचे सांगत विधानसभा उमेदवारी वरून घरात वाद नव्हता फक्त चर्चा होती ती आता संपली आहे नगराध्यक्ष पदा साठी आमच्या घरातला उमेदवार दिला त्यावेळी विरोधकांची घालमेल झाली पण त्यासाठीच आणि माघार घेण्यासाठीच उमेदवारी दिल्याचे पाचपुते यांनी सांगितले तसेच सुजय विखे यांच्या परभवा ची खंत त्यांनी बोलून दाखवली श्रीगोंद्याचा मुंबई शहरा सारखा कायापालट करण्याचे आश्वासन त्यांनी दिले
श्रीगोंद्याचे ग्रामदैवत शेख महंमद महाराज यांची यात्रा भरवण्यासाठी जागेची अडचण असून मंदिरा समोरील पोलीस वसाहती कबी जागा यात्रेसाठी कायमस्वरूपी देण्याची मागणी आज करण्यात आली नगरध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांनी मंदिराचा जीर्णोद्धार आणि शहराचा विकास हे दोनच उद्दिष्टे आपल्या समोर असल्याचे सांगितले
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना संदीप नागवडे यांनी ज्या नेत्यांची खुर्ची गोल आहे सारखी गोल फिरते त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये असे सांगितले आण्णासाहेब शेलार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होत असतानाच नागवडे यांच्या वक्तव्याने आता त्यांच्या प्रवेशालाच विरोध दर्शवल्याचे बोलले जात आहे
यावेळी पोपट खेतमाळीस,बाळासाहेब महाडिक,जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांची भाषणे झाली
सूत्रसंचालन शहराध्यक्ष धनराज कोथिंबीरे यांनी केले
काँग्रेसचे माजी नगरसेवक असिफ इनामदार,जावेद सय्यद,प्रशांत उबाळे,अमोल दंडनाईक यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधवानी भाजपात प्रवेश केला
काँग्रेसचे माजी नगरसेवक असिफ इनामदार,जावेद सय्यद,प्रशांत उबाळे,अमोल दंडनाईक यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधवानी भाजपात प्रवेश केला
श्रीगोंद्याला खमक्या नगराध्यक्षा लाभल्या...सरकारची पूर्ण ताकद उभी करू....
Reviewed by Prashasak
on
जानेवारी ११, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
जानेवारी ११, २०२६
Rating:



कोणत्याही टिप्पण्या नाहीत: