"स्वीकृत" नगरसेवक पदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट...ते पत्र गेले कुठे..प्रशासनाकडून सारवा सारव!


प्रशासक न्यूज,दि.12जानेवारी 2025

श्रीगोंदा नगरपरिषदेत आज उपनगराध्यक्ष पदासह स्वीकृत नगरसेवक पदाची निवड प्रक्रिया पार पडली भाजपचे नगरपरिषदेत बहुमत असल्यामुळे भाजपचाचा उपनगराध्यक्ष होणार हे निश्चित होते त्या प्रमाणे भाजप च्या सौ अलका अनभुले यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली

शिवसेना शिंदे पक्षाकडून अनिता औटी यांचा उपनगराध्यक्षपदा साठी उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता तर भाजपकडून अलका अनभुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यात भाजपच्या अनभुले यांना 13मते तर शिवसेनेच्या औटी यांना 9मते मिळाली बहुमत असल्यामुळे भाजपच्या अनभुले यांची उपानगराध्यक्ष पदी निवड झाली

परंतु स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले नियमाप्रमाणे भाजप चा एक आणि विरोधी शिवसेना पक्षाचा एक स्वीकृत नगरसेवक होईल असे वाटतं असतानाच आज स्वीकृत नगरसेवक पदी भाजपकडून आमीन शेख आणि महावीर पटवा यांची निवड झाली त्यामुळे विरोधी शिवसेना नगरसेवकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले

शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांचे नाव स्वीकृत नगरसेवक पदासाठी देण्यात आले होते परंतु आज त्यांच्या नावाचे शिफारस पत्रच प्रांतअधिकारी कार्यलयाकडून आले नसल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले याबाबत शिवसेना पक्षाचे नगरसेवक अख्तर भाई शेख यांना प्रतिक्रिया विचारली असता प्रांताधिकारी यांच्याकडे आम्ही विचारणा केली असता त्यांनी आपण मनोहर पोटे यांचे शिफारस पत्र श्रीगोंदा नगरपरिषदेकडे पाठवल्याचे सांगितले पण पालिका मात्र ते शिफारस पत्र आले नसल्याचे सांगत आहे त्यामुळे पोटे यांच्या नावाचे शिफारस पत्र गेले कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच या बाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे शेख यांनी सांगितले


याबाबत प्रांत अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता तो झाला नाही

शिवसेनेच्या मनोहर पोटे यांच्या नावाची शिफारस प्रांत अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती आज नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक पदाच्या नावाचा लिफाफा उघडण्यात आला त्यात भाजपच्या सात उमेदवारांची नावे होती परंतु पोटे यांच्या नावाचे शिफारस पत्रच नगरपरिषदे कडे आलेले नसल्यामुळे भाजप कडून नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांनी आमीन शेख आणि महावीर पटवा यांच्या स्वीकृत नगरसेवक पदाची घोषणा केली

आजच्या या निवड प्रक्रिये मुळे नगरपरिषदेत एकच खळबळ उडाली असून नेमके शिवसेनेच्या मनोहर पोटे यांच्या स्वीकृत नगरसेवक पदाचे शिफारस पत्र गेले कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत नगरपरिषद आणि प्रांताधिकारी कार्यालय एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे दिसून आले 
"स्वीकृत" नगरसेवक पदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट...ते पत्र गेले कुठे..प्रशासनाकडून सारवा सारव! "स्वीकृत" नगरसेवक पदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट...ते पत्र गेले कुठे..प्रशासनाकडून सारवा सारव! Reviewed by Prashasak on जानेवारी १२, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.