"त्यांना" कायद्याची अर्धवट माहिती.. दोष मात्र प्रशासनाला... आमदारांचा प्रतिसवाल!


प्रशासक न्यूज,दि.१२जानेवारी२०२५

श्रीगोंदा नगरपरिषदेत आज स्वीकृत नगरसेवक निवडीत मोठी नाट्यमय घडामोड पहायला मिळाली त्यानंतर आमदार विक्रम पाचपुते यांनी माऊली निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वीकृत नगरसेवक निवडीच्या विषयावर बोलताना विरोधी गटाच्या लोकांना कायद्याची अर्धवट माहिती आहे त्यातून त्यांचा अर्ज फेटाळला मग त्याचा दोष ते प्रशासनाला का देतायेत असे सांगत विरोधकांना च प्रति सवाल केला तसेच २०१४ सालानंतर नगराध्यक्षांना अधिकार देण्यात आलेले आहेत कायद्यात अनेक बदल झालेले आहेत त्या नुसार नामनिर्देशीत सदस्य म्हणून अर्ज भरताना त्या पक्षाच्या गटनेत्याचे शिफारस पत्र जोडावे लागते ते दिले नसल्या कारणाने त्यांचा अर्ज फेटाळला असे आमदार पाचपुते यांनी सांगितले या पत्रकार परिषदेसाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते देखील उपस्थित होते

तसेच यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पाचपुते म्हणाले कि,आमदार म्हणून माझा प्रशासनावर दबाव असता तर भाजप च्या दोन जणांचे अर्ज बाद झाले नसते भाजपकडून आठ उमेदवारांची नावे देण्यात आली होती त्यातले सहा जणांची नावे मंजूर होऊन आल्याचे सांगत आपला या निवड प्रक्रियेत कुणावर कसलाच दबाव नसल्याचे आमदार पाचपुते यांनी स्पष्ट केले

*स्वीकृत ची बक्षीसी... मंदिर निर्माणाचा प्रश्न मार्गी लागणार का?
श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत शेख महंमद महाराज यांच्या मंदिर निर्माणात शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट चे अध्यक्ष आमीनभाई शेख हे खोडा घालतात असा आरोप करत यात्रा कमिटी आणि काही भाविकांनी एकत्र येऊन मागे आठ दिवस आंदोलन केले होते त्याचवेळी मंदिराची जमीन वकफ बोर्डाकडे शेख यांनी नोंदणी केल्यामुळे आमीन शेख यांच्या विरोधात असंतोष उफाळून आला होता त्याच शेख यांना आज भाजपने स्वीकृत पदाची बक्षीसी दिल्यामुळे अनेक ठिकाणी नाराजीचा सुर बघायला मिळाला तरी या निवडीमागे आमदार विक्रम पाचपुते यांची राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे या निवडीच्या माध्यमातून मंदिर जीर्णोद्धाराचा प्रश्न मार्गी लावला जाईल त्यासाठीच पाचपुतेनी हा डाव टाकल्याची चर्चा आहे त्यामुळे आता तरी ग्रामदैवत महंमद महाराज यांच्या मंदिराचा प्रश्न सुटणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

*लिंपणगाव रेल्वेगेट वर उड्डाणंपुल होणार*
लिंपणगाव रेल्वेगेट ला वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याबाबत आमदार पाचपुते यांना विचारले असता त्या ठिकाणी उड्डाणंपुल मंजूर झालेला आहे ९० कोटी रु निधी मंजूर होऊन कामाची वर्क ऑर्डर देखील झाली होती परंतु ९० टक्के जमीन अधिग्रहण झाल्याशिवाय काम सुरु करायचे नाही असा केंद्राचा नियम आल्यामुळे पुलाच्या कामाला विलंब होत आहे जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांचा सुद्धा विरोध नाही अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच या ठिकाणी उड्डाणपूल होईल असे आमदार पाचपुते यांनी स्पष्ट केले

*कोणत्याही अतिक्रमणाला अभय नाही.. प्रवाश्यांची गैरसोय नको म्हणून कामास विलंब*
श्रीगोंदा शहरातून जाणाऱ्या ५४८ डी महामार्गवरील लहान व्यवसायीकांची अतिक्रमणे काही महिन्यांपूर्वी तातडीने हटवण्यात आली परंतु अद्यापही त्या रस्त्याचे काम सुरु झालेले नाही त्यातच या मार्गांवरील पक्की बांधकामे मोठ्या इमारती अजून जैसे थेच असल्यामुळे लहान व्यावसायिक याबाबत नाराजी व्यक्त करत असल्याबाबत आमदारांना विचारणा केली असता कुठल्याही नियमबाह्य बांधकामाला कुणाचेही अभय नाही नियमानुसार सर्वांना नोटीसा गेलेल्या आहेत त्याची सुनावणी सुरु आहे लहान अतिक्रमने पटकन काढता येतात त्या उलट पक्की बांधकामे हटवण्या बाबत वेगळे नियम असून त्याची प्रक्रिया सुरु आहे शिरूर कडून येणाऱ्या रस्त्याचे आधीच काम सुरु आहे त्यामुळे एकच वेळी दोन्ही रस्त्याची कामे सुरु केल्यास प्रवाश्यांचे हाल होतील ते टाळण्यासाठी ५४८ डी चे काम प्रलंबीत असून ते लवकरच सुरु होईल असे आश्वासन आमदारांनी दिले

इच्छुकांमध्ये अनेक नावे भाजपकडे असताना अचानक आमीन शेख यांच्या नावावर शिक्का मोर्तब का करण्यात आले असे विचारले असता काही चर्चा बंद दाराआडच कराव्या लागतात राजकारणात सगळ्याच गोष्टी जाहीर करता येत नाही असे आ पाचपुते यांनी सांगत कायदेशीर मार्गाने मंदिराचा प्रश्न सोडवला जाईल असे त्यांनी सांगितले तसेच भाजप मध्ये ज्या ज्या लोकांना शब्द दिला आहे तो आपण पाळणार असून सदर निवडी या मर्यादित काळासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले 
"त्यांना" कायद्याची अर्धवट माहिती.. दोष मात्र प्रशासनाला... आमदारांचा प्रतिसवाल! "त्यांना" कायद्याची अर्धवट माहिती.. दोष मात्र प्रशासनाला... आमदारांचा प्रतिसवाल! Reviewed by Prashasak on जानेवारी १२, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.