"निवड"होताच भूमिका मवाळ..सहकार्य करण्याची ग्वाही.. ग्रामदैवताच्या मंदिराचा प्रश्न सुटणार?


प्रशासक न्यूज,दि.१३जानेवारी२०२५

श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धाराचा प्रश्न दर्गाह आणि ट्रस्ट यांच्यात सुरु असलेल्या वादात अनेक वर्ष्यापासून अडकून पडला आहे महंमद महाराज हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून राज्यात प्रसिद्ध आहेत त्यामुळे शिर्डीच्या धर्तीवर या मंदिराचा विकास व्हावा ही समस्त श्रीगोंदेकरांची मनापासून इच्छा आहे

परंतु शेख महंमद बुवा देवस्थान ट्रस्ट आणि दर्गाह कमिटी यांच्यात अनेक वर्ष्यापासून वाद सुरु आहे हा वाद न्यायालयात देखील गेला आहे मंदिराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी यात्रा कमिटी आणि दर्गाह ट्रस्ट चे आमीन भाई शेख यांच्यात आतापर्यत अनेकवेळा चर्चा झाल्या अनेक नेत्यांनी बैठका घेऊन हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला पण हा वाद काही केल्या सुटत नव्हता आणि त्यामुळे ग्रामदैवताच्या मंदिराचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला होता मंदिर निर्माण करण्याच्या मुद्द्यावर आमीन शेख हे विरोध करत असून मंदिरातून ते बाहेर पडत नसल्यामुळे मंदिर निर्माणात अडथळा येत असल्याचे सांगून काही महिन्यांपूर्वी यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ यांनी शेख यांच्या भूमिके विरोधात तहसील कार्यलयासमोर उपोषण केले होते त्यातच शेख यांनी मंदिराच्या जमिनीची वकफ बोर्डाकडे नोंद केल्याचे समोर आल्यानंतर हा वाद जास्तच चिघळला होता त्यामुळे शेख महंमद महाराज मंदिराच्या विकासाचा प्रश्न पुन्हा रखडणार असे वाटतं असतानाच काल झालेल्या नामनिर्देशीत सदस्य निवडीत(स्वीकृत नगरसेवक)भाजप ने दर्गाह ट्रस्ट चे अध्यक्ष आमीन भाई शेख यांनाच भाजप कडून संधी दिल्यामुळे आता मंदिराच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागणार असे चित्र निर्माण झाले आहे

आमीन शेख यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड होताच त्यांनी मंदिर प्रश्नात  लगेच मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून आले काल रात्री त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करून आमदार विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वात लवकरच मंदिराचा विस्तार करणार असल्याची जाहीर ग्वाही दिल्यामुळे मंदिराच्या विकासाचा प्रश्न सुटण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे स्वीकृत पदी निवड होताच शेख यांनी दोन पावले मागे येत शेख महंमद महाराज देवस्थानचा विकास करण्यासाठी आमचा कधीच विरोध नसल्याचे जाहीर केले आहे

*आमदारांच्या राजकीय खेळीने एका दगडात दोन पक्षी गारद..*
 आमदार विक्रम पाचपुते यांनी आमीन शेख यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड करून एका दगडात दोन पक्षी गारद केल्याचे पहायला मिळत आहे शेख यांना भाजपकडून संधी देऊन मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व देत त्यांना खुश करण्यासह आमीन शेख यांचा मंदिर निर्माणात होणारा अडसर,विरोध दूर करत शेख यांना दोन पाऊले मागे येण्याबाबत आणि त्यांचे मत परिवर्तन करण्यात आमदार यशस्वी झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही

त्यामुळे आता आमदारांनी टाकलेला हा नवा राजकीय डाव ग्रामदैवताच्या मंदिर निर्माणासाठी कितपत फायदेशीर ठरणार हे येणाऱ्या काळातच समजणार आहे


*मंदिराचा विकास होणार असेल तर आम्ही सोबत... पण आमीन शेख यांच्यावर विश्वास नाही.. गोपाळ मोटे पाटील..अध्यक्ष शेख महंमद महाराज यात्रा कमिटी*
मंदिराचा विकास व्हावा हीच आमची प्रामाणिक भावना आहे पण विकास करत असताना विकास निधी मंदिर म्हणून देणार कि दर्गाह म्हणून देणार हे आधी स्पष्ट करा.. ज्या व्यक्तीने सगळ्या गावाला वेठीस धरले त्यांनाच नगरसेवक करणे कितपत योग्य आहे मंदिराच्या विकासासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत परंतु आमीन शेख यांच्या वर आमचा विश्वास नाही 

*शेख यांच्या निवडीनंतर सोशल मीडियावर नाराजीचा सुर*
मंदिर निर्माणात अडथळा आणणाऱ्या आणि मंदिराची जमीन वकफ च्या घशात घालणाऱ्या व्यक्तीलाच स्वीकृत नगरसेवक पदाची बक्षीसी दिली,भाजपचे हे बेगड हिंदुत्त्व असल्याच्या पोस्ट काल काही हिंदुत्व वादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर करत भाजपने आमीन शेख यांच्या केलेल्या निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली

*त्यांच्या मागे असलेली अदृश्य शक्ती आज उघड झाली...जेष्ठ नेते घनश्याम आण्णा शेलार*
आता पर्यत संपूर्ण गाव आणि यात्रा कमिटीला आमीन शेख हे एकटे कसे पुरून उरतात गाव एकीकडे असताना सुद्धा शेख कुणाच्या जीवावर एवढी ताकद दाखवतात असा प्रश्न आता पर्यत सामान्य लोकांना पडला होता परंतु काल भाजप ने आमीन शेख यांची स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती केल्यामुळे शेख यांच्या पाठीमागे कोणती अदृश्य शक्ती कार्यरत होती कोणते अदृश्य हात त्यांना मदत करत होते हे काल झालेल्या निवडीवरून स्पष्ट झाले आणि शेख यांच्या पाठीवर कुणाचा हात होता हे आता सर्वांना समजले आहे अशी जहरी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते घनश्याम आण्णा शेलार यांनी दिली
"निवड"होताच भूमिका मवाळ..सहकार्य करण्याची ग्वाही.. ग्रामदैवताच्या मंदिराचा प्रश्न सुटणार? "निवड"होताच भूमिका मवाळ..सहकार्य करण्याची ग्वाही.. ग्रामदैवताच्या मंदिराचा प्रश्न सुटणार? Reviewed by Prashasak on जानेवारी १३, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.