प्रशासक न्यूज,दि.५जानेवारी२०२५
श्रीगोंदा शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांची दादागिरी वाढल्याचे चित्र शहरात राजरोस घडणाऱ्या काही घटनानमधून पाहायला मिळत आहे
काल दि. ४ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या अश्याच एका घटनेमुळे पुन्हा एकदा याचा प्रत्यय नागरीकांना अनुभवायला मिळाला आहेशहरातील एका गजबजलेल्या आणि अतिशय वर्दळीच्या भागात असणाऱ्या हॉटेलमध्ये एक विवाहित महिला जेवण करत असताना त्याचवेळी लाल रंगाच्या स्कुटीवरून आलेल्या तरुणाने हॉटेल समोर उभे राहून पीडित महिलेकडे एकटक बघत तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले सदर तरुण फक्त एवढ्यावरच थांबला नाही तर
पीडित महिला हॉटेल मधून बाहेर पडून घरी जात असताना या टवाळखोर तरुणाने पुन्हा त्या महिलेचा पाठलाग सुरु केला घाबरलेल्या महिलेने आपल्या पती ला फोन लावून सदर प्रकार सांगितला त्यानंतर त्या महिलेचा पती मित्रानसह घटनास्थळी गेला तेव्हा हा तरुण महिलेचा पाठलाग करत असल्याचे दिसून आल्यानंतर महिलेचा पती व त्याच्या मित्रांनी पाठलाग करणाऱ्या तरुणाला याबाबत जाब विचारत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता या तरुणाने महिलेच्या पतीला व त्याच्या मित्रांनाच शिवीगाळ करत अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी दिलीत्यानंतर संबंधित तरुणाला पकडून पोलीस स्टेशनला आणण्यात आले तिथे सुद्धा हा तरुण चूक मान्य करण्या ऐवजी पीडित महिलेला आणि तिच्या पतीलाच दमदाटी करत तुम्हाला बघून घेतो अशी धमकी देत होता पोलिसांना सुद्धा त्याने जुमानले नाही हे विशेष
त्यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून छेड काढणाऱ्या पंकज रामदास नरसाळे मुळगाव-गोरेगाव ता पारनेर हल्ली रा. श्रीगोंदा याच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रात्री शहरातील अंत्यत गजबजलेल्या परिसरात हा प्रकार घडल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे
"विवाहित" महिलेचा पाठलाग... आणि.... जाब विचारणाऱ्या पतीलाच जीवे मारण्याची धमकी..!
Reviewed by Prashasak
on
जानेवारी ०५, २०२६
Rating:
Reviewed by Prashasak
on
जानेवारी ०५, २०२६
Rating:



कोणत्याही टिप्पण्या नाहीत: