प्रशासक न्यूज,दि.२७नोव्हेंबर २०२५
ट्रॅक्टर घेऊन जनावरांचा चारा आणण्यासाठी गेले असता ट्रॅक्टरचा ताबा सुटल्यामुळे ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर खाली दबल्यामुळे दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथे बुधवार (दि.२६) रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत ट्रॅक्टर चालविणारी मुलांची आई आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी झाले आहेत
प्राप्ती किरण महाडिक वय १०वर्षे, शिवांश किरण महाडिक वय ४ वर्षे असे मयत झालेल्या चिमुकल्या बहीण भावांची नावे आहेत तर कावेरी किरण महाडिक वय ३५ आणि क्रांती किरण महाडिक असे जखमी झालेल्या माय लेकीची नावे आहेत.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील कावेरी किरण महाडिक या जनावरांचा चारा संपल्याने शेतातून चारा आणण्यासाठी बुधवार (दि.२६) रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर घेऊन गेल्या. सोबत त्यांच्या प्राप्ती महाडिक,शिवांश महाडिक आणि क्रांती महाडिक या तीन मुलांना देखील घेऊन गेल्या होत्या. चारा घेऊन माघारी येत असताना किरण महाडिक यांचा ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. यावेळी पलटी झालेल्या ट्रॅक्टर खाली तीन मुले आणि कावेरी महाडिक दाबल्या गेल्या. या अपघातात प्राप्ती महाडिक आणि शिवांश महाडिक यांचा दवाखान्यात घेऊन जात असताना मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर चालवत असलेल्या कावेरी महाडिक आणि क्रांती महाडिक या दोघी गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मन पिळवटून टाकणारी घटना...ट्रॅक्टर उलटला आणि क्षणात....!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर २७, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर २७, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: