प्रशासक न्यूज,दि.२२नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तीन तरुणांच्या दुचाकीचा अपघात होऊन त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा काष्टी रस्त्यावर होलेवाडी शिवारात घडली आहे या अपघातात निखिल केशव भंडाणे वय.२१ रा.करसुंडी, मांजरसुंबा जि. बीड याचा मृत्यू झाला असून ओमप्रकाश श्यामसुंदर मोराळे रा.वाघे बाभुळगाव, जि. बीड श्रेयश संजय रकीबे रा. नाशिक हे दोघे तरुण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत
सदर अपघाता बाबत समजलेली माहिती अशी कि सदर तिघेही तरुण वैद्यकीय शिक्षणासाठी श्रीगोंद्यात राहत होते रात्री दोन च्या सुमारास ते हिरो होंडा कंपनीच्या सी डी हंड्रेड दुचाकी क्रं.एम एच१६,क्यू.९६६६ हिच्यावरून श्रीगोंद्यातून काष्टीकडे जात असताना त्यांच्या दुचाकीचा होलेवाडी शिवारात अपघात झाला या अपघातात निखिल भंडाणे मयत पावला तर इतर दोन तरुण गंभीर जखमी झाले या अपघाताबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
मध्यरात्री च्या सुमारास अपघात झाल्यामुळे अपघात नेमका कसा घडला याबाबत नेमकी माहिती समजू शकली नाही परंतु कुठल्या तरी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात झाल्याची चर्चा समजली आहे
एवढ्या रात्रीच्या वेळी हे तरुण वसतीगृहातून काष्टीकडे कशासाठी चालले होते याबाबत वेगवेगळे सवाल उपस्थित होत आहेत
'महाविद्यालयीन' शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा मृत्यू.. दोघे गंभीर जखमी!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर २२, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर २२, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: