"बालकाच्या" हत्येचा एक तासात लावला छडा.. बेलवंडी पोलिसांची कौतुकास्पद कारवाई.. आईकडूनच...!


प्रशासक न्यूज,दि.२८नोव्हेंबर २०२५

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील नहेरमळा येथील सुदाम दळवी यांच्या शेतामधील विहिरीच्या पाण्यात एका आठ महिन्याच्या बालकाचा मृतदेह तरंगत असल्याची खबर काल दि २७रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बेलवंडी पोलिसांना मिळाली होती त्यानंतर घटनेचे गंभीर्य ओळखत सहायक पो नि नंदकुमार सोनवलकर यांनी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता विहिरीच्या पाण्यात आठ महिन्याच्या बालकाचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता चौकशी दरम्यान सदर मृतदेह हा योगेश सुदाम दळवी यांचा मुलगा कार्तिक याचा असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसांनी अशोक दळवी यांनी दिलेल्या खबरीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद केली
 
सदर प्रकार हा घातपाता चा असल्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत मयत कार्तिक याची आई, चुलती आणि चुलता यांच्याकडे चौकशी केली चौकशीत ते उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांचा संशय बळावला त्यानंतर पोलिसांनी प्रश्नाचा भडीमार आणी पोलीसी खाक्या दाखवताच मयत कार्तिक याची आई सोनाली हिने कबुली देत काल सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास तीची जाऊ घरात देवपूजा करत असताना आणि आजूबाजूला कुणी नसताना मुलगा कार्तिक झोळीत झोपलेला असताना त्याला झोळीतून बाहेर काढून त्याला ब्लॅंकेट मध्ये गुंडाळून आणून रागाच्या भरात घराजवळील विहिरीच्या पाण्यात टाकून जीवे ठार मारल्याचे पोलिसांना सांगितले त्यानंतर मयत कार्तिक याचे वडील योगेश दळवी यांनी वरील हकीकतीवरून पत्नी सोनाली ही नेहमी किरकोळ कारणावरून चिडचिड करत असते ती मानसिक तणावात असते तीने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे सांगून बेलवंडी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यावरून आपल्याच आठ महिन्याच्या बाळाचा जीव घेणारी कार्तिक ची आई सोनाली दळवी हिच्या विरोधात गुन्हा नोंदवत तिला अटक करण्यात आली आहे

घटना घडल्यानंतर अवघ्या एक तासाच्या आता बेलवंडी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावत आरोपी अटक केल्यामुळे बेलवंडी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे
"बालकाच्या" हत्येचा एक तासात लावला छडा.. बेलवंडी पोलिसांची कौतुकास्पद कारवाई.. आईकडूनच...! "बालकाच्या" हत्येचा एक तासात लावला छडा.. बेलवंडी पोलिसांची कौतुकास्पद कारवाई.. आईकडूनच...! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर २८, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.