प्रशासक न्यूज,दि.१डिसेंबर२०२५
हंगेवाडी ता.श्रीगोंदा येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या सौ. चांदणीताई यांचा लहानपणापासून च समाजकारणाकडे कल आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये त्यांनी दहावी पर्यंत चे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थीदशेत असताना च त्यांनी ग्रामीण मुलींना शिक्षण, आरोग्य, स्वच्छता,अन्याय कणखर पणे मोडून काढणे.. इत्यादी विषयावर अतिशय प्रेरणादायी कार्य करायला सुरुवात केली.
लग्नानंतर श्रीगोंदा येथील दिलीपराव खेतमाळीस यांच्या मोठया व एकत्र कुटुंबात आल्या. तेथेही कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल ठेवून त्या परिवारातील सर्वांच्याच लाडक्या झाल्या. बोलका विनोदी स्वभाव, आकर्षक व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्या भोवती सतत मैत्रिणी, नातेवाईक यांचा घोळका असतो. त्या नेहमीच सर्वांच्या सुख, दुःखात न चुकता त्यांच्या सोबत असतात यावरून त्यांचं हळवं आणि संवेदनशील मन दिसून येतं.
शहरातील विकास कामांसोबत शहरातील नागरिकांचं शारीरिक व मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी त्या सदैव प्रयत्नशील असतात. यासाठी आधी त्यांनी पाच वर्षांपूर्वी स्वतः प्राणायाम, ध्यान धारणा, योगा चा समावेश असलेला "सिद्ध समाधी योग "(SSY) हा वर्ग केला. त्यानंतर त्यांनी श्रीगोंद्यात SSY चे अनेक वर्ग घेवून सुमारे 500 पेक्षा जास्त लोकांच्या जीवनात आनंद फुलविणे, आरोग्य उंचावणे, डिप्रेशन मुळे जगण्याचा कंटाळा आलेल्याना नव्याने जगण्यासाठी आशेचा किरण देणे... या गोष्टींमध्ये अनमोल असे योगदान दिले आहे...
कोविड संकटात त्यांचा एकुलता एक लाडका भाऊ.. पांडुरंग रायकर [तत्कालीन TV9 चा रिपोर्टर, पत्रकार ] याचे अकाली अकस्मित निधन झाले, त्यापाठोपाठ त्यांचे वडीलही गेले... एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला.. पण त्यांनी पुन्हा नव्याने जगण्याची उमेद निर्माण केली.. आणि ठरवलं यानंतर जगायचं ते दिन, दुःखी, पीडित, गरजू यांच्या च साठी. त्यांचे सर्वच सामाजिक उपक्रम यासाठीच असतात...
त्यांच्या याच सामाजिक दृष्टिकोनातून त्यांची लोकप्रियता गगनाला भिडली आहे सौ चांदणी दिलीप खेतमाळीस या जनतेच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत
सदैव सकारात्मक दृष्टीकोण ठेवून समाजकार्यासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या सौ. "चांदणीताई खेतमाळीस"....
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर ०१, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर ०१, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: