"चौरंगी" लढतीत कोण मारणार बाजी....सर्वांचेच जोरदार शक्ती प्रदर्शन.. जनतेचा कौल कुणाच्या बाजूने!


प्रशासक न्यूज,दि.१डिसेंबर२०२५
विशाल अ चव्हाण 

श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूकीसाठी उद्या दि २डिसेंबर मंगळवार रोजी मतदान होत आहे शहरातील विविध मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासना कडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे

श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक यावेळेस होत असलेल्या चौरंगी लढतीमुळे विशेष चर्चेत आहे महाविकास आघाडी कडून गौरी भोस,भाजप कडून सुनीता खेतमाळीस,राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)पक्षाकडून ज्योती खेडकर तर शिवसेना(शिंदे गट)पक्षाकडून माजी नगराध्यक्षा शुभांगी पोटे या नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरल्या आहेत

 श्रीगोंदा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असले तरी याठिकाणी सर्वच पक्षानी महिला उमेदवार उभ्या केल्या आहेत हे सुद्धा या निवडणुकीचे वैशिष्टय म्हणावे लागेल तसेच अनेक तरुण आणि नवीन चेहेऱ्यांना या निवडणुकीत उमेदवारी करण्याची लॉटरी लागली आहे डमी उमेदवारी अर्थात बी फॉर्म रद्द झाल्यामुळे काहींचा हिरमोड झाला आहे पाचपुते विरुद्ध सर्व नेते अशी निवडणूक होणार असे वाटतं असतानाच सर्वच नेत्यांनी सवता सुभा मांडल्यामुळे चौरंगी लढत होत आहे

विकासाच्या नावाखाली राष्ट्रवादी (अजित पवार गट)पक्षात एकवटलेल्या नेत्यांपुढे या निवडणुकीत विजयाचे मोठे आव्हान असणार आहे सर्व दिग्गज नेते एकत्रित आल्यामुळे त्यांना आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणून पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना रिझल्ट दाखवावा लागणार आहे त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी च्या नेत्यांसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे मनोहर पोटे यांच्या साठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे पत्नी शुभांगी पोटे यांना मैदानात उतरवून त्यांनी कोणताही मोठा स्थानिक नेता पाठीशी नसताना शिवसेना शिंदे गटाचा स्वतंत्र प्यानेल उभा केल्यामुळे त्यांच्यासाठी ही अग्निपरीक्षा असणार आहे तर जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी आपल्या सुनबाईना मैदानात उतरवून आपले वेगळे अस्तित्व वेगळी ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आमदार विक्रम पाचपुते यांच्यासाठी ही निवडणूक एक च्यालेंज असणार आहे त्यामुळे आता श्रीगोंद्याच्या रंगतदार लढाईचा शेवट काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यत काहीतरी राजकीय चमत्कार होईल आणि दुरंगी लढत होईल पाचपुतेना खिंडीत गाठण्यासाठी विरोधक एकवटतील अश्या चर्चा होत्या पण त्या प्रत्यक्षात चर्चाच राहिल्या आणि पाचपुते विरोधकांमध्येच मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळाले

*चौरंगी लढत मत विभागणी कुणाच्या पथ्यावर*

यंदा चौरंगी लढत होत आहे श्रीगोंद्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत जातीय समीकरणाचा मोठा प्रभाव बघायला मिळतो यावेळेस दोन माळी समाजातील तर दोन मराठा समाजातील उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी नशीब अजमावत आहेत त्यामुळे निश्चितच मराठा आणि माळी समाजाच्या मतांची चार ठिकाणी विभागणी होणार आहे त्यातच श्रीगोंद्यात असणारा मुस्लिम मतदार आणि इतर समाज यांची मते या निवडणुकीत अत्यंत निर्णायक ठरणार आहेत त्यामुळे या निवडणुकीत होणाऱ्या मत विभागणीचा फायदा कुणाच्या पथ्यावर आणि तोटा कुणाला घरी बसवणार हे तीन तारखेला निकालाच्या दिवशीच समजणार आहे

*चारही पक्षाचे जोरदार शक्ती प्रदर्शन*
मागील दोन तीन दिवसात महाविकास आघाडी भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे सर्व उमेदवारांनी घर टू घर जात मतदारांच्या गाठी भेटी घेत रान पेटवलं आहे त्यामुळे या निवडणुकीचा अंदाज लावणे मुश्किल झाले आहे असे असले तरी मतदारांची पसंती कुणाला मिळते हे उद्या होणाऱ्या मतदाना नंतरच पाहायला मिळणार आहे
"चौरंगी" लढतीत कोण मारणार बाजी....सर्वांचेच जोरदार शक्ती प्रदर्शन.. जनतेचा कौल कुणाच्या बाजूने! "चौरंगी" लढतीत कोण मारणार बाजी....सर्वांचेच जोरदार शक्ती प्रदर्शन.. जनतेचा कौल कुणाच्या बाजूने! Reviewed by Prashasak on डिसेंबर ०१, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.