प्रशासक न्यूज,दि.२डिसेंबर२०२५
श्रीगोंदा शहरातील होळकर वस्ती परिसरात आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राहणारे अरुण देशवन हे घराजवळील शेतात प्रात:विधिसाठी गेले असता पिसाळलेल्या कोल्ह्याने त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्या चेहेऱ्याला चावा घेतला
त्यानंतर आज सायंकाळी उशिरा स्टेशन रस्त्यावर असलेल्या गुरुमाऊली नर्सरी येथील एका वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या सविता घोडवल या महिलेवर कोल्ह्याने हल्ला करत महिलेच्या पायाचा चावा घेतला असून महिला यात जखमी झाली आहे
घटनेची माहिती समजल्यानंतर वनविभागाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली भगत,वनपाल अनिल खराडे,वनरक्षक चंद्रकांत मरकड,नितीन डफडे, रंजना घोडके यांनी घटनास्थळी जाऊन पिसाळलेल्या कोल्ह्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण कोल्हा पळून गेला सदर घटनेमुळे शहरात बिबट्याने हल्ला केल्याच्या अफवांचे मोठे पेव फुटले होते त्यामुळे आज लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते त्यामुळे लोकांनी अफ़वानवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे
श्रीगोंद्यात पुरुषासह.. एक महिला जखमी.. अफवांचे पेव!
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर ०२, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
डिसेंबर ०२, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: