प्रशासक न्यूज,दि.१०ऑगस्ट२०२५
एका चारचाकी गाडीतून चार तरुण मित्र देव दर्शनासाठी जात असताना अचानक त्या गाडीचा टायर फुटला आणि गाडीने चार पलट्या खाल्ल्या परंतु या चारही तरुणांचे दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला या अपघातातून चारही तरुण सुखरूप बचावले आहेत मात्र यातील तीन तरुणांच्या पायाला या अपघातात गंभीर दुखापत झाली असून एक जणाला किरकोळ स्वरूपात मार लागला आहे
या भयंकर अपघाताची घटना श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव शिवारातील छत्तीसे वस्ती येथे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली असून या अपघातात तालुक्यातील चोराचीवाडी येथील ओम चव्हाण,हर्षद अनभुले,प्रथमेश साळुंके,साळुंके(पूर्ण नाव समजले नाही)हे सर्व २१ते २२ वर्ष्याचे चार तरुण जखमी झाले आहेत
सदर घटनेबाबत प्राथमिक समजलेली माहिती अशी की चोराचीवाडी गावातील हे तरुण आज एका स्विफ्ट डिझायर कार मधून सौताडा या ठिकाणी देव दर्शनासाठी निघाले होते त्यांची कार श्रीगोंदा जामखेड रस्त्यावरील आढळगाव शिवरातील छत्तीसे वस्ती येथे आली असता त्यांच्या कारचा टायर फुटला टायर फुटल्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला जाऊन कारने चार पलट्या खाल्ल्या कारने एवढ्या पलट्या घेऊन सुद्धा तरुण सुखरूप बचावले परंतु अपघातात यातील दोन तरुणांच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर दोन तरुण जखमी झाले अपघातानंतर त्या भागातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणांना तात्काळ उपचारासाठी श्रीगोंद्याला पाठवले या तरुणांवर श्रीगोंदा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
दैव बलवत्तर म्हणून....श्रीगोंदा तालुक्यातील घटना!
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट १०, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट १०, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: