"या" दुचाकी,चारचाकी वाहनचालकांना पोलिसांचा दणका...!


प्रशासक न्यूज,दि.८ऑगस्ट२०२५

श्रीगोंदा शहरातील मुख्य बाजारपेठेत तसेच रहदारीच्या रस्त्याने अनेक तरुण बुलेट वरून जाताना सायलेन्सर मधून फटाकड्या चा आवाज काढत होते अशाप्रकारे सायलेन्सर मधून फटाकड्याचा आवाज काढणाऱ्या दुचाकीस्वारांनी श्रीगोंदा शहरात उच्छाद मांडला होता याबाबत श्रीगोंदा पोलिसांना अनेक सुज्ञ् नागरिकांनी तक्रार केली होती त्याची दखल घेत श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील वाहतूक कर्मचारी ॲक्शन मोड मध्ये आले आहेत

आज दिवसभरात वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी आजिनाथ जाधव यांनी त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह शहरातील वेगवेगळ्या भागात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला
एकूण ३० वाहनांवर कारवाई..४६,५००रुपयांचा आकारला दंड
वाहतूक पोलिसांनी आज शहरातील वेगवेगळ्या भागात वाहतूकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या वाहनांवर कारवाई केली यामध्ये
फटाके फोडणाऱ्या ४बुलेट वर कारवाई करत ४हजार दंड आकारला,विना नंबर प्लेट फिरणाऱ्या ६ वाहनांवर कारवाई करत ३हजार रु दंड आकारणी,विना लायसन -दोन केस करत
त्यांच्यावर १०हजार रुपये दंड आकारणी केली, ट्रिपल सीट च्या पाच केसेस करत ५हजार रुपये दंड आकारणी केली, चारचाकी ला असेलेल्या काळ्या काचावर(ब्लॅक ग्लास)कारवाई करत
त्या १३ केस करत २४हजार ५००रुपये दंड आकारणी केली अश्या प्रकारे श्रीगोंद्यात आज एका दिवसात पोलिसांनी एकूण ३० वाहनांवर कारवाई करत जवळपास ४६,५००रुपयांची दंडात्मक कारवाई केली

या कारवाई दरम्यान फटाके फोडणाऱ्या बुलेटचे सायलेंसर पोलिसांनी जप्त करत ज्या चारचाकी वाहनांच्या काचेवर काळ्या रंगाची फिल्मिंग करण्यात आली होती ती देखील फाडून टाकण्यात आली

पोलिसांच्या कारवाईचे स्वागत होत असले तरी या कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी नागरिक करत आहेत तसेच जे दुकानदार अश्या प्रकारे सायलेंसर विकत आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी नागरिक करत आहेत
"या" दुचाकी,चारचाकी वाहनचालकांना पोलिसांचा दणका...! "या" दुचाकी,चारचाकी वाहनचालकांना पोलिसांचा दणका...! Reviewed by Prashasak on ऑगस्ट ०८, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.