वाहन चालकांनो सावधान... श्रीगोंदा शहरातील "हे" ठिकाण ठरतंय धोकेदायक! प्रशासनाला जाग कधी येणार?


प्रशासक न्यूज,दि.७ऑगस्ट२०२५

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आणि श्रीगोंदा नगर परिषदेचा हलगर्जीपणा या दोन्ही विभागाच्या गलथान आणि निष्क्रियतेचा फटका सामान्य वाहनचालकांना बसत आहे याचे कारण म्हणजे श्रीगोंदा शहरातील जकाते वस्ती येथे काष्टी आणि श्रीगोंदा स्टेशन कडे जाण्यासाठी जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी रस्त्याचे दुभाजक जिथे संपलेले आहे आणि जिथे दोन रस्ते एकत्र येतात त्याठिकाणी कुठलेही वाहनचालकांना मार्गदर्शक रिफ्लेकटर लावलेले नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी काष्टीकडून श्रीगोंद्याच्या दिशेने येणाऱ्या अनेक वाहनचालकांना समोरून दुसऱ्या वाहनाची लाईट डोळ्यावर चमकल्यानंतर रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे या ठिकाणी असलेल्या दुभाजकावर येऊन वाहने धडकत आहेत 

या ठिकाणी कुठलेही रिफ्लेकटर किंवा दिशादर्शक फलक नसल्यामुळे आतापर्यत अनेक वाहने या रस्त्यावर असलेल्या दुभाजकाला येऊन धडकत आहेत यात वाहनांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे इथून पुढच्या काळात तरी हे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ खबरदारी घेत या रस्त्यावर रेडियम असलेला फलक लावणे गरजेचे आहे

*अर्ध्या तासाच्या आत दोन वाहने धडकली*

आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास साधारणपणे आर्धा तासाच्या आत दोन चारचाकी वाहने या ठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे दुभाजकाला धडकून अपघात झाल्याची घटना घडली दोन्ही वाहनातील एअर बॅग उघडल्यामुळे सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही असे असले तरी या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे या दुभाजकाला वाहन धडकून त्याचा टायर फुटला त्यानंतर त्या ठिकाणी राहणारे सामाजिक कार्यकर्ते आजिम भाई जकाते व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर ठिकाणी धाव घेत अपघातग्रस्त वाहनातील लोकांना मदत केली सदर वाहन हे कर्जतकडे निघाल्याची माहिती समजली तर दुसरे अपघातग्रस्त वाहन कुठले होते याची माहिती समजू शकली नाही

मागील काही दिवसापूर्वी अश्याच प्रकारे दुभाजकाला धडकून एक इर्टिगा कार याचठिकाणी पलटी झाली होती आणि आज अश्या प्रकारे दोन वाहने या दुभाजकाला धडकून अपघात झाल्यामुळे लोकांमधून संताप व्यक्त होत आहे प्रशासनाने तात्काळ याठिकाणी मार्गदर्शक फलक उभारण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आजिमभाई जकाते,बबलूभाई जकाते आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे
वाहन चालकांनो सावधान... श्रीगोंदा शहरातील "हे" ठिकाण ठरतंय धोकेदायक! प्रशासनाला जाग कधी येणार? वाहन चालकांनो सावधान... श्रीगोंदा शहरातील "हे" ठिकाण ठरतंय धोकेदायक! प्रशासनाला जाग कधी येणार? Reviewed by Prashasak on ऑगस्ट ०७, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.