हे सत्र नेमके थांबणार कधी?दीड वर्ष्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी चोरी,पोलिसांचा धाक कमी झालाय का?


प्रशासक न्यूज,दि.३ऑगस्ट२०२५

साधारणपणे दीड वर्ष्यांपूर्वी श्रीगोंद्यातील मखरेवाडी(गणेशनगर) येथील राहिवासी भरत मारुती वाळके यांच्या घरी चोरी झाली होती त्यात त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरट्यानी चोरून नेले होते त्याच चोरीचा अद्याप छडा लागलेला नसतानाच आज पहाटे च्या सुमारास पुन्हा वाळके यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यानी अंदाजे सहा ते सात तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे

पहिल्याच चोरीचा कसलाच तपास झालेला नसतानाच आज परत त्याच घरी चोरट्यानी चोरी केल्यामुळे पोलिसांचा या चोरांवर कुठलाच धाक उरला नसल्याचे दिसत आहे वाळके यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या शालनबाई पोटे यांचे तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील दागिने चोरट्यानी चोरून नेले आहेत

सदर घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की भरत वाळके यांनी कालच आपल्या शेतात काम करताना आपल्या हातातील अंगठ्या घरातील कपाटात ठेवल्या होत्या आणि उर्वरित दागिने त्यांनी त्यांच्या खालच्या घरातील गॅसच्या टाकी खाली ठेवले होते वाळके हे त्यांच्या कुटुंबासह वरच्या खोलीमध्ये झोपलेले असताना आज पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद खोलीचा दरवाजा तोडून खोलीतील सामानाची उचकापाचक करत कपाटात ठेवलेल्या अंगठ्या आणि गॅसच्या टाकी खाली ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले त्याचवेळी शेजारीच राहणाऱ्या शालन बाई पोटे यांना दमदाटी करत त्यांचा गळा व तोंड दाबून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेले एकाच रात्रीत दोन ठिकाणी चोरट्यानी धाडसी चोरी केली या चोरीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून चोऱ्यांचे हे सत्र कधी थांबणार पोलीस या चोरीचा आता तरी छडा लावणार का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत
हे सत्र नेमके थांबणार कधी?दीड वर्ष्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी चोरी,पोलिसांचा धाक कमी झालाय का? हे सत्र नेमके थांबणार कधी?दीड वर्ष्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी चोरी,पोलिसांचा धाक कमी झालाय का? Reviewed by Prashasak on ऑगस्ट ०२, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.