श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावानजीक असलेल्या गणपती मळा परिसर,चोभे वस्ती या परिसरातील नागरिक सध्या मोठ्या दहशतीत आहेत त्याचे कारणं म्हणजे या भागात वारंवार होत असलेल्या बिबट्याच्या जोडीचे दर्शन.
मागील काही दिवसात या भागात अनेक जणांना या बिबट्याच्या जोडीचे दर्शन झाले आहे आता नुकतेच चार दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास बिबट्याची जोडी येथील एका चारीने बिनधास्त फिरत असल्याचे अनके लोकांनी पाहिले त्यामुळे या परिसरात मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे
याच भागात राहणारे शेतकरी ऍड विजय चोभे यांची जवळपास १५एकर केशर आंब्याची बाग आहे या बागेत अनेकदा बिबट्याचा वावर दिसून आला आहे एकवेळा तर हा बिबट्या बागेतील चोभे यांच्या घराजवळ देखील आला होता परवा दिवशी रात्री ऍड चोभे हे त्यांची शेतातील मोटार चालू करण्यासाठी गेले असता पुन्हा त्यांना त्या ठिकाणी हा बिबट्या दिसून आला बिबट्याची जोडी बिनधास्तपणे या परिसरात फिरत असल्यामुळे रात्रीचेच काय तर दिवसा सुद्धा आता लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत त्यामुळे वनविभागाने तात्काळ याठिकाणी पिंजरा लावून बिबट्याची ही जोडी पकडण्याची मागणी नागरिक करत आहेत
*दीपाली भगत यांची तात्काळ दखल*
सदर भागात बिबट्याचा मुक्त संचार असल्याबाबत श्रीगोंदा वनविभागाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली भगत यांना फोनवरून कळवले असता त्यांनी याची तात्काळ दखल घेत त्यांचे वनपाल मरकडं यांना घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठवले मरकडं यांनी देखील क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी जाऊन पाहणी केली
*बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या*
वनपाल मरकडं यांनी त्यांच्या सहकाऱ्यासह ऍड विजय चोभे यांच्या बागेत जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी बिबट्याच्या पाऊलखुणा त्यांना आढळून आल्या असून वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच या ठिकाणी पिंजरा लावण्यात येईल असे त्यांनी सांगितले
त्यामुळे आता या भागातील बिबट्याची ही जोडी कधी पिंजऱ्यात कैद होते या कडे या भागातील लोकांचे लक्ष लागले आहे.

"त्या"जोडीचा मुक्त वावर...आता या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट १०, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट १०, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: