
प्रशासक न्यूज,दि.१३ऑगस्ट२०२५
सामान्य नागरीक किंवा समाजातील कोणताही घटक त्याच्यावर कुणी अन्याय करत असेल किंवा कुणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक काही दुष्कृत्य करत असतील कुणावर दहशत करत असतील अन्याय करत असतील तर अश्यावेळी सर्वच स्तरातील घटक पोलीस ठाण्यात जाऊन न्याय मागतात त्यांना विश्वास असतो की पोलीस आपल्याला मदत करतील न्याय मिळवून देतील परंतु याच पोलिसांना जर पैसे खाण्याचा भसम्या रोग झाला असेल आणि ते सामान्य लोकांना पैश्यासाठी त्रास देत असतील तर मग नेमकी न्यायाची अपेक्षा ठेवायची कुणाकडून असा प्रश्न उपस्थित झाला आहे
सामान्य नागरीक किंवा समाजातील कोणताही घटक त्याच्यावर कुणी अन्याय करत असेल किंवा कुणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक काही दुष्कृत्य करत असतील कुणावर दहशत करत असतील अन्याय करत असतील तर अश्यावेळी सर्वच स्तरातील घटक पोलीस ठाण्यात जाऊन न्याय मागतात त्यांना विश्वास असतो की पोलीस आपल्याला मदत करतील न्याय मिळवून देतील परंतु याच पोलिसांना जर पैसे खाण्याचा भसम्या रोग झाला असेल आणि ते सामान्य लोकांना पैश्यासाठी त्रास देत असतील तर मग नेमकी न्यायाची अपेक्षा ठेवायची कुणाकडून असा प्रश्न उपस्थित झाला आहे
श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये पाच महिन्यात दुसऱ्यांदा लाचलुचपत विभागाची कारवाई झाली असून या कारवाई मुळे श्रीगोंदा पोलीस स्टेशन हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनत चाललंय की काय असा प्रश्न श्रीगोंद्याच्या जनतेला पडला आहे
तक्रादारांनी धाडस दाखवत पुढे येऊन तक्रार दिल्यामुळे भ्रष्टाचाराची ही प्रकरणे समोर आली पण अनेक प्रकरणात पोलिसांच्या भीती पोटी आणि कायदेशीर कारवाई पासून वाचण्यासाठी मोठी रक्कम देऊनही लोक गप्प राहत आहेत तर आम्ही पैसे दिल्यामुळे आमचे पोलीस काहीच वाकडे करणार नाहीत असा आत्मविश्वास पोलीसांच्या पैसे घेण्याच्या वृत्तीमुळे अनेक गुन्हेगारांमध्ये निर्माण झाल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत
पाच महिन्यांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात शहर बिटला काम करणारे फलके नावाचे कर्मचारी लाच घेताना सापडले होते आणि काल पुन्हा शहर बिटला काम करणाऱ्या घोडे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना रांगेहाथ पकडले आहे त्यामुळे श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे आणि यामुळेच श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नेमक चाललंय काय असा सवाल उपस्थित होत असून या कर्मचाऱ्यांना पैसे घेण्यासाठी पाठबळ कोण देतंय असा सवाल उपस्थित होत आहे
*पोलीस निरीक्षक जबाबदार त्यांच्यावर कारवाई करा*
पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारून एक वर्षे झाले आहे ते याठिकाणी हजर झाल्यावर काहीतरी चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा सर्वांना वाटतं होती परंतु शिंदे हे हजर झाल्यापासूनच पोलीस ठाण्यात वाढदिवस साजरा करणे,तक्रार देण्यासाठी आलेल्या आदिवासी तरुणाला मारहाण,किंवा तक्रार देण्यासाठी आलेल्या लोकांना ही पोलिसांची जबाबदारीच नाही असे सांगत त्यांची तक्रार न घेणे, त्यांच्या एक वर्ष्याच्या कार्यकाळात दोन वेळा लाचलुचपतची झालेली कारवाई,चोरी,घरफोडीच्या घटनामध्ये झालेली वाढ, अनेक गुन्ह्यांचा प्रलंबीत तपास यामुळे शिंदे यांची कामागिरी निराशाजनक ठरली आहे तसेच त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर देखील सर्वच स्तरातून मोठी नाराजी व्यक्त होत आहे
त्यातच एकाच पोलीस निरीक्षकाच्या कार्यकाळात दोनवेळा लाचलुचपतची कारवाई होऊन त्याच पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी लाच घेताना सापडणे हे बहुधा श्रीगोंद्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले असावे त्यामुळे श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला पो नि शिंदे यांना जबाबदार धरत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी केली असून कर्मचाऱ्यांना पैसे घेण्यासाठी तेच खतपाणी घालत असल्याचा आरोप देखील भोस यांनी केला आहे त्यामुळे आता या घटनेनंतर पोलीस निरीक्षकांवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
*कायद्याचे रक्षक की लुटारुंची टोळी*
पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत परंतु श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील सध्याची परिस्थिती पाहता श्रीगोंदा पोलीस स्टेशन मधील पोलीस हे कायद्याचे रक्षक आहेत की सामान्यांची आर्थिक लूट करणारी टोळी आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे या प्रकरणात आता वरिष्ठ अधिकारी लक्ष घालणार का हे येणाऱ्या काळातच समजणार आहे
*साहेबाकडून त्या कर्मचाऱ्यांना फ्री हॅन्ड*
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सध्या साहेबाची काही कर्मचाऱ्यांवर विशेष मर्जी असून त्यातील एका कर्मचाऱ्याने त्याच्या वेगवेगळ्या कारनाम्यानी मोठा "ऊत"आणलेला असताना सुद्धा साहेबाची त्या कर्मचाऱ्यावर विशेष मर्जी असून आर्थिक मलिदा गोळा करण्यासाह वेगवेगळ्या तडजोडी करण्याची मोठी जबाबदारी या कर्मचाऱ्यावर साहेबांनी सोपावली आहे तसेच या साहेबांनी मर्जीतल्या इतर काही कर्मचाऱ्यांना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणाहून मलिदा गोळा करण्यासाठी सध्या फ्री हॅन्ड दिल्याचे दिसत आहे
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात एवढा गैरकारभार सुरु असताना सुद्धा वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे त्यामुळे आतातरी श्रीगोंदा पोलीस ठाण्याची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीस अधिक्षकांनीच श्रीगोंद्यात लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे
*फटाके फोडत आनंद साजरा*
भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यावर लाचलुचपतची कारवाई झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस,सतीश बोरुडे यांनी शनीचौकात फटाके फोडत आनंद साजरा केला तसेच पैश्यांसाठी जर कुठल्या शासकीय कार्यलयात सामान्य लोकांची अडवणूक होत असेल कुणी काम करण्यासाठी पैसे मागत असतील तर आपल्याला संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नेमक चाललंय तरी काय? पोलीस ठाणे की भ्रष्टाचाराचा अड्डा?
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट १२, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट १२, २०२५
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: