मन सुन्न करणारी घटना!बापाने पोटच्या चार मुलांना विहिरीत ढकलले!


प्रशासक न्यूज,दि.१६ऑगस्ट२०२५

पत्नीसोबत झालेल्या वादातून आपल्या पोटच्या चार मुलांना विहिरीत ढकलून देत स्वतः देखील विहिरीत उडी घेत बापाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना राहता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारात घडली आहे

श्रीगोंदा तालुक्यातील चिखली गावातील अरुण सुनील काळे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने आपली एक मुलगी आणि तीन मुलांना विहिरीत ढकलून दिले मुलांना पोहोता येत नसल्यामुळे विहिरीच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला मयत काळे यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे

मिळालेल्या माहितीनुसार मयत अरुण काळे याने राहता तालुक्यातील कोऱ्हाळे गावच्या शिवारात हे कृत्य केलं. त्याने रस्त्याच्या बाजूला आपली टू व्हीलर लावल्याचं दिसून आलं. शिवानी अरुण काळे (वय 8 ), प्रेम अरुण काळे (वय 7), वीर अरुण काळे (वय 6) आणि कबीर अरुण काळे (वय 5) अशी मयत मुलांची नावे आहेत. या चौघांना अरुण काळेने पाण्यात ढकलून दिलं. शेवटी स्वतःही हात-पाय बांधून आत्महत्या केली.

अरुण काळे हा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव या गावात राहायचा. त्याला तीन मुले आणि एक मुलगी होती. घरातील वादामुळे त्याची पत्नी आठ दिवसांपूर्वी त्याला सोडून गेली होती. त्यामुळे अरुण काळेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं असून अद्याप दोघांचा शोध सुरू आहे. जवळपास 45 फूट खोल ही विहीर आहे. त्यातच पाऊस पडत असल्याने शोधकार्यात अडथळा येत आहे. एक हात आणि एक पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत विहिरीत अरुण काळेचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे स्वतःचे हात पाय स्वतः बांधून अरुण काळेने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मन सुन्न करणारी घटना!बापाने पोटच्या चार मुलांना विहिरीत ढकलले! मन सुन्न करणारी घटना!बापाने पोटच्या चार मुलांना विहिरीत ढकलले! Reviewed by Prashasak on ऑगस्ट १६, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.