प्रशासक न्यूज,दि.१७ऑगस्ट२०२५
श्रीगोंदा नगरपरिषदेची निवडणूक येत्या काही दिवसात पार पडणार आहे नगरपरिषदेसाठी अनेक जण इच्छुक आहेत काहींनी नगरसेवक होण्याच्या दृष्टीने आतापासूनच तयारी सुरु केली आहे परंतु या इच्छुकांचे भवितव्य उद्या ठरणार असून उद्या होणाऱ्या प्रभागरचनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
उद्या सकाळी श्रीगोंदा नगरपरिषदेची प्रभागरचना जाहीर होणार आहे यावर्षी राखीव जागांची संख्या एक ने वाढून ती तीन होणार आहे त्यामुळे आता नेमका कोणता प्रभाग राखीव होणार कुणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अनेक इच्छुक देव पाण्यात ठेवून बसले आहेत असे असले तरी कुठला प्रभाग कुठे जोडला कोणता प्रभाग कुणाच्या पथ्यावर पडणार कुठला प्रभाग कुणाच्या अडचणीचा ठरणार हे उद्या सकाळी समजणार आहे प्रभागरचना जाहीर झाल्यावर पुढील तीन दिवसात त्यावर हरकती घेता येणार आहेत
धाकधूक वाढली,अखेर ती वेळ आलीच... इच्छुकांचा जीव टांगणीला!
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट १७, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट १७, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: