मागासवर्गीय सरपंच महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न... जीवघेणा हल्ला... श्रीगोंद्यात कायदा सुव्यस्थेचे तीन तेरा!
प्रशासक न्यूज,दि.१७ऑगस्ट२०२५
श्रीगोंदा तालुक्यात सध्या कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसत असून गुंडगिरी करणाऱ्या लोकांची दहशत वाढल्यामुळे पोलीसांचा धाक संपल्याचे चित्र आहे
श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी गावच्या महिला सरपंच मीनाक्षी सकट यांच्यावर आज दोन जणांनी जीवघेणा हल्ला करत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांना जबर मारहाण देखील केल्याची धक्कादायक आणि कायदा सुव्यस्थेची लकतर वेशिवर टांगणारी घटना आज रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरानजीक वडाळी रस्त्यावर जंगलाजवळ घडली आहे हल्ला करणाऱ्यांनी सकट यांची दुचाकी पेटवून दिली असून त्यात दुचाकी जळून पूर्णतः खाक झाली आहे
या जीवघेण्या हल्ल्यातून सरपंच मीनाक्षी सकट या बालंबाल बचावल्या असून श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत
मीनाक्षी सकट यांच्या फिर्यादीवरून काही जणांवर काही दिवसांपूर्वी अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला होता त्यातीलच एका आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती सौ सकट यांनी दिली आहे तसेच आधी तक्रार दाखल असताना सुद्धा पोलिसांनी कुठलीच कारवाई आरोपीनविरोधात केलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे
एका महिला सरपंचाला अश्या प्रकारे पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे
सकट यांच्या सोबत त्यांचा लहान मुलगा देखील यावेळी होता त्याच्या पॅन्टवर देखील पेट्रोल पडले होते
सरपंच मीनाक्षी सकट यांनी दिलेल्या माहिती नुसार आज रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्या श्रीगोंद्याकडून वडाळी रस्त्याने जात असताना जंगला जवळ दुचाकीवर दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांच्या तोंडावर बॅटरी चमकवली त्यानंतर सकट या थांबल्यानंतर त्यांच्या अंगावर हल्लेखोरांनी पेट्रोल टाकले यात त्यांच्या अंगावरील कपड्यानी पेट घेतला तर त्यांच्या सोबत असलेला मुलगा लांब पळाला प्रसंगावधान दाखवल्यामुळे सौ सकट या बचावल्या त्या ठिकाणी आलेल्या काही सुज्ञ नागरिकांनी सकट यांना मदत केली ऍड प्रेरणा धेंडे यांनी पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले
मागासवर्गीय सरपंच महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न... जीवघेणा हल्ला... श्रीगोंद्यात कायदा सुव्यस्थेचे तीन तेरा!
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट १७, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट १७, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: