विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या नेत्यांना श्रीगोंदेकर जनतेच्या प्रश्नांचाच पडलाय विसर?


प्रशासक न्यूज,दि.२७ऑगस्ट २०२५

विशाल अ चव्हाण
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांना पराभूत करण्यासाठी आणि एकमेकांची जिरवण्यासाठी विरोधात निवडणूक लढवणारे सर्वच नेते आता निवडणुका होऊन गेल्यानंतर आपसातील सर्व मतभेद दूर ठेवून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आता एकत्र आले आहेत विधानसभा निवडणुकीला एकमेकांना पराभूत करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे सर्व नेते आता मात्र श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी आपण एकत्र आल्याचे सांगत आहेत परंतु तालुक्यातील हे सर्व प्रमुख नेते सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून अनेक दिवस झालेले असताना सुद्धा या नेत्यांकडून जनहिताच्या किंवा लोकविकासाच्या दृष्टीने कोणतेही पाऊल अद्यापपर्यत उचललेले दिसलें नाही

सिसपे सारख्या कंपनीने श्रीगोंदा तालुक्यातील हजारो लोकांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक केलेली असताना सुद्धा या प्रश्नावर अजित पवार गटाच्या कोणत्याच नेत्याने आवाज उठवला नाही श्रीगोंदा तालुक्यातील प्रशासनाच्या कारभारात एवढा मोठा सावळा गोंधळ सुरु असताना त्यावर कोणताच नेता चकार शब्द बोलायला तयार नाही श्रीगोंदा शहरातील रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत या खड्ड्यामुळे श्रीगोंदेकर जनता त्रस्त आहे असे असताना सुद्धा हे खड्डे बुजवण्यासाठी विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचे सांगणाऱ्या नेत्यांनी साधे कुठले निवेदन किंवा कोणता पत्रव्यहार केल्याचे दिसले नाही या प्रश्नांसह आरोग्याचे,विजेचे प्रश्न नागरिकांना भेड सावत आहेत श्रीगोंदा तालुक्यातील तरुणांच्या रोजगाराच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असणाऱ्या एमआयडीसीचे पुढे काय झाले त्यासाठी पाठपुरावा करताना एकही नेता दिसत नाही त्या प्रश्नावर सुद्धा विकासाच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांचे दुर्लक्षच झाल्याचे दिसत आहे

लोकविकासासाठी एकत्र आलेल्या सर्वच नेत्यांचे श्रीगोंद्यात संपर्क कार्यलय आहेत परंतु त्या संपर्क कार्यलयाचा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्षात किती उपयोग होतो हे अजून समजलेले नाही
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना कायम भेडसावणाऱ्या कुकडीच्या पाणी प्रश्नावर,साकळाई योजना,डिंभे माणिकडोह बोगदा या प्रश्नावर हे नेते त्यांची एकीची ताकद वापरणार का? की स्वहीत साधून घेण्यात धन्यता मानणार हे येणाऱ्या काळात समजणार आहे

*भविष्यातील निवडणुकांसाठी जुळवा जुळव*
लोकांच्या विकासासाठी एकत्र आल्याचे सांगणारे हे नेते जनतेच्या कुठल्याही प्रश्नावर बोलताना दिसत नसले तरी काही महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद निवडणुका यांच्यासाठी मात्र आतापासूनच जुळवा जुळव करत असल्याचे दिसत आहे या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर श्रीगोंद्यात या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या एकत्रित बैठका देखील घेतल्या आहेत
त्यामुळे एकीचा नारा देणारे नेते लोकांच्या विकासापेक्षा स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यातच पुढे असल्याचे सध्या तरी दिसत आहे

*नेत्यांचे मनोमिलन कार्यकर्त्यांचे होणार का?*
आपापसातील टोकाचे मतभेद विसरून राजेंद्र नागवडे,राहुल जगताप,आण्णासाहेब शेलार,घनश्याम शेलार,बाळासाहेब नाहाटा,दत्तात्रय पानसरे हे सर्व नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात एकत्र आले आहेत परंतु नेते एकत्र आले असले तरी त्यांचे कार्यकर्ते एकत्र येतील का याबाबत अनेक सवाल उपस्थित होत आहेत नुकत्याच शहरात पार पडलेल्या अजित पवार गटाच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून आणि बाजार समितीमधील सुरु असलेल्या राजकारणावरून काही प्रमुख कार्यकर्त्यांनी नेत्यांना खडे बोल सुनावत आपण खरच एकत्र आलो आहोत का असा उलट सवाल विचारल्याचे समजतं आहे त्यामुळे नेत्यांचे मनोमिलन झालेले असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणार का असा सवाल उपस्थित होत आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शुक्रवारी श्रीगोंद्यात सभा होणार आहे या सभेतून हे सर्व नेते हम साथ साथ हे म्हणत एकीचा नारा देणार आहेत त्यांची ही एकी तालुक्याच्या विकासात किती मोलाची भूमिका बजावणार हे थोड्याच दिवसात समजणार आहे
विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या नेत्यांना श्रीगोंदेकर जनतेच्या प्रश्नांचाच पडलाय विसर? विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या नेत्यांना श्रीगोंदेकर जनतेच्या प्रश्नांचाच पडलाय विसर? Reviewed by Prashasak on ऑगस्ट २७, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.