पोलिसांनी केलेली ती कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात.. पोलिसांवर गंभीर आरोप.. चौकशी होणार का?


प्रशासक न्यूज,दि.२७ऑगस्ट२०२५

श्रीगोंदा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील पेडगाव रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत कारवाई केली होती परंतु आती ही कारवाईच संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे याचे कारणं म्हणजे या कारवाईनंतर अनेक आरोप पोलिसांवर होत आहेत त्यातून पोलिसांच्या या कारवाईवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत

जुगार खेळताना पोलिसांनी २२ जणांना पकडले होते एवढा मोठा जुगार सुरु असताना रोख रक्कम फक्त ६६हजार रुपयेच कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे तर दोन महिन्यांपूर्वीच याच जुगार अड्डयावर कारवाई झालेली असताना परत त्याच ठिकाणी एवढा मोठा जुगार अड्डा पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय सुरु असणं शक्यच नसल्याचे बोलले जात होते त्याला आता खुद्द सदर जुगार अड्डा चालवणारे चालक स्वप्नील खेत्रे यांनीच त्याबाबत कबुली दिली आहे पोलिसांना पैसे देऊन सुद्धा त्यांनी कारवाई केल्याचा गंभीर आरोप केला आहे या आरोपांची पोलीस अधीक्षक आता चौकशी करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे 

जुगार सुरु असताना पोलिसांनी छापा टाकला तेव्हा ७लाख९५हजार रुपयांची रोकडं त्या ठिकाणी होती परंतु पोलिसांनी मात्र प्रत्यक्षात कारवाईत ६६हजार रुपये एवढीच रोख रक्कम दाखवली गेल्याचा गंभीर आरोप जुगार अड्डा चालक स्वप्नील खेत्रे यांनी आता केला आहे त्यामुळे पोलिसांनी केलेली ही कारवाई आता वादात सापडली आहे २२ जुगारी जुगार खेळत असताना फक्त ६६ हजारांचीच रोकडं कशी असा प्रश्न आता यामुळे उपस्थित झाला आहे

*पोलिसांच्या सहमतीनेच अड्डा सुरु*
पोलीसांच्या सहमतीनेच आपण पैसे देऊन हा जुगार अड्डा चालवत होतो छापा टाकल्यानंतर सदर ठिकाणी ७लाख ९५हजार रुपयांची रोकडं पंचासमक्ष मोजण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात मात्र कमी मुद्देमाल दाखवण्यात आला असा आरोप करतानाच स्वप्नील खेत्रे यांनी पोलीस निरीक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत तसेच पोलीस निरीक्षकांच्या कारभाराची पोलखोल करणार असल्याचे त्यांनी सांगितले 

*फिर्यादी पोलीस आणि आरोपी सोबत*
रोख रकमेवरून पोलिसांवर आरोप होत असतानाच कारवाई झाल्यानंतर या कारवाई मधील फिर्यादी पोलीस आणि काही आरोपी बिनधास्त सोबत फिरत असताना दिसून आले त्यामुळे या कारवाई मागचे गुढ अजून वाढले आहे
अवैध व्यवसायिकांकडून आर्थिक मलिदा घेऊन पोलिसांकडून मूक संमती दिली जाते हे जगजाहीर आहे

आर्थिक देवाणघेवाणी च्या वादातून सदर कारवाई झाल्याचा आरोप देखील आता होत आहे

शिवाय पोलिसांना ठरलेला मलिदा देऊन देखील पोलिसांनी जाणीवपूर्वक ही कारवाई केल्याचा आरोप होत आहे

*लाचलुचपत कडे तक्रार*
पोलिसांच्या मागणीप्रमाणे सर्व आर्थिक बाबींची पूर्तता करून देखील जाणीवपूर्वक ही कारवाई केल्यामुळे चिडलेल्या एका अवैध व्यवसायीकाने याबाबत थेट लाचलूचपत विभागाकडे तक्रार केल्याची माहिती समजली असून त्यातूनच काल श्रीगोंद्यात दिवसभर लाचलूचपतचे कर्मचारी ठाण मांडून बसले होते परंतु याची कुणकुण लागल्यामुळे कारवाई होऊ न शकल्याची खात्रीशीर माहिती समजली आहे

या सर्व आरोपांमुळे पोलिसांनी केलेली कारवाई आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून याची चौकशीची मागणी होत आहे 


पोलिसांनी केलेली ती कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात.. पोलिसांवर गंभीर आरोप.. चौकशी होणार का? पोलिसांनी केलेली ती कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात.. पोलिसांवर गंभीर आरोप.. चौकशी होणार का? Reviewed by Prashasak on ऑगस्ट २७, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.