पहिल्यांदाच आमदार..विधानसभेत षटकार...प्रश्नांचा "विक्रम" पाचपुते यांची 'लक्षवेधी' कामगिरी

प्रशासक न्यूज,दि.१९जुलै २०२५
विशाल अ चव्हाण 

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला हे अधिवेशन सूरु झाल्यापासूनच राज्यपातळीवर महत्वाचे असणारे प्रश्न विधिमंडळात उपस्थित करत आपल्या मतदारसंघातील महत्वाच्या विविध विषयांवर विधिमंडळात अभ्यासपूर्ण मांडणी करून श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघांचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतल्याचे यावेळी पाहायला मिळाले
मागील अधिवेशनात आ पाचपुते यांनी बनावट पनीरचा मुद्दा उपस्थित करत राज्याचे लक्ष वेधले होते

यावेळेस विधिमंडळ अधिवेशनात आमदार विक्रम पाचपुते यांनी गुटख्या सारख्या गंभीर विषयावर राज्यात गुटखा बंदी असताना सुद्धा गुटखा, सुगंधी पानमसाले यांची सर्रास विक्री,वाहतूक कशी होते असा सवाल उपस्थित करत आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली पाचपुते यांनी विधानसभेत याबाबत लक्षवेधी उपस्थित करताच जिल्ह्यात पोलीस ॲक्शन मोडवर आले विविध ठिकाणी गुटखा विक्री, निर्मिती वाहतूक यावर छापे टाकत मोठी कारवाई करण्यात आली

गुटखा विक्रीवर प्रहार करतानाच त्यांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालत त्याबाबत कठोर कारवाईची मागणी केली

नगर जिल्ह्यातील एलसीबी च्या भ्रष्ट कारभारावर ताशेरे ओढत त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले तसेच श्रीगोंदा तालुक्यात पोलीस उपाधीक्षक कार्यालय व्हावे या मागणीसह पोलिसांच्या विविध मुद्द्यावर आमदार पाचपुते यांनी प्रश्न मांडले तसेच सीसपे ऑनलाईन रमी,बिंगो अश्या आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपण्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याबाबत पाचपुते यांनी विधानसभेचे लक्ष वेधले,दूध भेसळीबाबत देखील त्यांनी मत मांडले

तसेच मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या साकळाई योजना, डिंभे माणिकडोह बोगदा, तालुक्यात मंजूर झालेल्या एमआयडीसी च्या कामाला गती मिळण्याबाबत तसेच सोलरपंप कंपण्यांची संख्या वाढवून खासगी कंपनीकडून सोलरपंप घेण्याची मुभा शेतकऱ्यांना मिळण्याबाबत आमदारांनी विधानसभेत मुद्दा मांडला
वारीत मयत व्यक्तींना मिळणाऱ्या मदतीत सुधारणा करत हृदयविकाराने मयत होणाऱ्या वारकऱ्यांना मदत मिळण्याबाबत, तसेच पायी चालण्यामुळे दुखापत झाल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागणाऱ्या वारकऱ्यांना मदत मिळण्याबाबत आ पाचपुते यांनी मागणी केली मतदारसंघातील प्रश्नांसह गिरणी कामगारांच्या मुद्द्याला हात घालत त्यांची फसवणूक करणाऱ्या छेडा रेसिडेन्सी वर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली

*लक्षवेधी सह विविध विधेयकांच्या चर्चेत सहभाग*
आ विक्रम पाचपुते यांनी या अधिवेशनात विविध विषयांवर लक्षवेधी उपस्थित करत सर्वांचे लक्ष तर वेधलेच पण त्यांनी विधिमंडळात मांडण्यात आलेल्या विविध विधेयकांवर झालेल्या चर्चेत सहभाग घेत आपले मत नोंदवले यात रस्त्याचे डिझाईन करताना ३०टन वाहतूक क्षमता लक्षात घेण्याची सूचना, ग्रामीण रस्त्याच्या दर्जान्नती संदर्भात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आंतर्गत हरकत नोंदवली तसेच महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा विधेयक चर्चेत सहभाग घेत गावठी दारूवर कडक कारवाई करत सदर गुन्ह्यात अजामीनपात्र कायदा करण्याची मागणी केली तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण विधेयकावरील चर्चेत सहभाग, तुकडेबंदी कायदा रद्द करण्यासंदर्भात झालेल्या चर्चेत सहभाग नोंदवत एसओपी मध्ये राष्ट्रीय व राज्य महामार्गांना प्राधान्य देण्याबाबत सूचना करून श्रीगोंदा नगर परिषदेतील विविध मुद्दे यावेळी त्यांनी मांडले

*सरकारला च्यालेंज करणाऱ्या मुद्द्यांची बेधडकपणे मांडणी*
गुटखाविक्री ला राज्यात बंदी असताना गुटख्याची विक्री कशी होते याची पोलखोल आमदार पाचपुते यांनी अधिवेशनात केली या प्रश्नासह सरकारला चॅलेंज करणारे अनेक मुद्दे पाचपुते यांनी सरकारमध्ये असून सुद्धा बेधडकपणे मांडल्या बाबत त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे

*पहिलेच वेळ तरी अभ्यासपूर्ण विषयांची मांडणी*
आमदार विक्रम पाचपुते हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत तरीसुद्धा त्यांनी राज्य,जिल्हा आणि तालुका पातळीवरील विषय ज्या पद्धतीने विधिमंडळात मांडले, विधिमंडळात मांडण्यात आलेल्या विविध विधायकांवर आपले मत नोंदवले,अनेक चर्चेत ते सहभागी झाले त्यावरून त्यांच्या अभ्यासू वृत्तीची झलक सर्वांनाच पाहायला मिळाली

*प्रश्न मांडण्याची संधी आणि उत्तरेही मिळवली*
आमदार म्हणून विक्रम पाचपुते यांची ही पहिलीच टर्म असून सुद्धा त्यांना विधिमंडळात प्रश्न मांडण्याची अनेक वेळा संधी मिळाली तसेच पाचपुते यांनी अनेक विषयांवर लक्षवेधी उपस्थित करत त्याला संबंधित मंत्र्यांकडून उत्तरे आणि आश्वासने देखील मिळवली

आ पाचपुते यांनी विधिमंडळात विविध प्रश्न मांडत सर्वांचे लक्ष तर वेधलेच शिवाय आपल्या मतदार संघातील काही सरपंच, विविध पदाधिकारी यांचा भाजपात प्रवेश करून घेत तालुक्यात मागील काही दिवसात राष्ट्रवादीत जाऊन पाचपुते विरोधी मोट बांधणाऱ्या नेत्यांना शह देत आपल्यातील राजकीय हुशारी दाखवून दिल्याचे बोलले जात आहे



पहिल्यांदाच आमदार..विधानसभेत षटकार...प्रश्नांचा "विक्रम" पाचपुते यांची 'लक्षवेधी' कामगिरी पहिल्यांदाच आमदार..विधानसभेत षटकार...प्रश्नांचा "विक्रम" पाचपुते यांची 'लक्षवेधी' कामगिरी Reviewed by Prashasak on जुलै १९, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.