"त्या" प्रकरणाच्या तपासावरच प्रश्नचिन्ह,दाखल गुन्हा नेमका कुणाच्या पथ्यावर?तपासाच घोड नेमक कुठं अडतंय?
प्रशासक न्यूज,दि.२०जुलै २०२५
श्रीगोंदा तालुक्यात अनेक गोरगरीब लोकांना महिन्याला जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवत मध्यस्थी दलालांमार्फत इन्फिनिटी बिकॉन या कंपनीत लाखो रुपये गुंतवण्यास सांगण्यात आले ठराविक दिवस परतावा दिल्यानंतर मात्र या कंपनीने ना कुठला परतावा दीला ना कुणाची मुद्दल रक्कम परत केली अनेक दिवसांपासून हा गोंधळ सुरु होता परंतु या आर्थिक फसवणूकी बाबत कुणीही तक्रार देण्यास समोर येत नव्हते अखेर कर्जत तालुक्यातील एका शिक्षकाने या आर्थिक फसवणूकीबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीवरून सदर कंपनीचे चालक मालक संचालक अश्या एकूण बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला काहीना ताब्यात घेण्यात आले परंतु त्यानंतर मात्र या तपासाची गती मंदावल्याचे दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झालेली असताना सुद्धा आतापर्यत या प्रकरणात एकच तक्रार दाखल झाली आहे हे विशेष हजारो लोकांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक झालेली असताना गुन्हा मात्र काही लाख रुपयांचाच दाखल झाला आहे नवीन आरोपी निष्पन्न करण्यात किंवा दाखल गुन्ह्यातील इतर आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना नेमक अपयश का येतंय याबाबत देखील साशंकता आहे तसेच फसवणूकीचा दाखल झालेला हा गुन्हा नेमका कुणाच्या पथ्यावर पडतोय याबाबत अनेक चर्चा रंगत आहेत
*तक्रारदारांची अनास्था की,रक्कम वाढू न देण्याची खबरदारी?*
७५लाख रुपयांच्या पुढे आर्थिक फसवणूक झाल्यास तो गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जातो सदर कंपनीत आर्थिक फसवणूक झालेल्या रकमेचा आकडा काही कोटीत असून सुद्धा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मात्र ७३लाख ५०हजार रुपये एवढ्याच रकमेच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे यामागचे गौडबंगाल काय हे मात्र समजायला तयार नाही नेमके या प्रकारणात तक्रारदार समोर येवून तक्रार दाखल करत नाहीत की तक्रार येऊन सुद्धा आर्थिक फसवणूकीचा आकडा ७५लाखांच्या आत कसा राहील याची खबरदारी जाणीवपूर्वक घेतली जात आहे याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत
*टोकन पोहोचल्याच्या चर्चा*
सिसपे प्रकरणात तालुक्यात अनेक एजंट लोक कार्यरत आहेत या लोकांनी विश्वास देऊन गुंतवलेली रक्कम आम्ही परत देऊ असा विश्वास गुंतवणूकदारांना देत लोकांना या कंपनीत मोठ्या रक्कमा गुंतवण्यास भाग पाडले होते या एजंट मार्फतच अनेक डॉक्टर,वकील,पोलीस,सामान्य नागरिक,शासकीय कर्मचारी,शिक्षक,कष्ट करी वर्ग,शेतकरी यांनी या कंपनीत लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक केली होती असे असताना पोलिसांना हे दलाल सापडत नाहीत का? असा सवाल उपस्थित होत असतानाच या प्रकरणातील काही एजंट लोकांनी एका वकीलाच्या मध्यस्थीने साहेबाला मोठं टोकन पोहोच केल्याची आता जोरदार चर्चा असून त्या टोकन मुळेच कानून के लंबे हात फसवणूक करणाऱ्या लोकांपर्यत पोहोचत नसल्याची खासगीत चर्चा आहे
*आमदारांची थेट विधानसभेत लक्षवेधी*
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी या प्रकरणाचे गंभीर्य लक्षात घेऊन थेट विधानसभेत या प्रश्नावर आवाज उठवत या प्रकरणी मकोका आंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली पण श्रीगोंद्यात मात्र या प्रकरणाच्या तपासाचे पोलिसांना फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे
*फसवणूक झालेल्यांना भीती आणि अनास्था*
या कंपनी कडून फसवले गेलेल्या लोकां मध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिक देखील आहेत आपण पुढे येऊन तक्रार दाखल केल्यास आपली समाजात बदनामी होईल या भीतीने फसवणूक होऊन सुद्धा काही लोक तक्रार देण्यासाठी पुढ येत नाहीत तर काही एजंट लोकांनी त्यांच्याकडे गुंतवणूक केलेल्या लोकांना तुम्ही आमच्या विरुद्ध तक्रार केली तरी आमचं काही होणार नाही पण तक्रार केल्यास तुमचे पैसे बुडतील ते मिळणार नाहीत अशी भीती घातल्यामुळे अनेक लोक आळीमिळी गुपचिळी म्हणत गप्प बसले आहेत
*अनेक तक्रार अर्ज प्राप्त*
सीस पे फसवणूक प्रकरणी एक गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक लोकांचे तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत परंतु त्यावर प्रत्यक्षात काय कारवाई झाली हे मात्र समजलेले नाही काही तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी संबंधित एजंट लोकांना बोलावून तक्रारदार व्यक्तीचे पैसे देण्यास सांगितले असून त्यातून अनेक जणांना त्यांच्या रकमेचे चेक मिळाल्याचे देखील समजतं आहे
या गुन्ह्यात आर्थिक फसवणूक झालेले अनेक गोरगरीब लोक आहेत त्यामुळे त्यांचे पैसे परत कसे मिळतील यासाठी प्रयत्न होणे आणि लोकांचे पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने तपास होणे गरजेचे आहे या प्रकरणाच्या आडून कुणीही आपली झोळी भरत उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न होऊ नये हीच अपेक्षा फसवणूक झालेले सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत
"त्या" प्रकरणाच्या तपासावरच प्रश्नचिन्ह,दाखल गुन्हा नेमका कुणाच्या पथ्यावर?तपासाच घोड नेमक कुठं अडतंय?
Reviewed by Prashasak
on
जुलै १९, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
जुलै १९, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: