प्रशासक न्यूज,दि.१८जुलै२०२५
श्रीगोंदा तालुक्यात आत्तापर्यत अनेक भागात बिबट्याचे दर्शन होत होते बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना देखील श्रीगोंदा तालुक्यात घडल्या आहेत पण आज एका वेगळ्याच घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून चक्क एका पिसाळलेल्या कोल्ह्याने काही लोकांवर हल्ला करत त्यांना चावा घेत जखमी केल्याची घटना आज दुपारी पेडगाव भागात घडली आहे
संतप्त गावाकऱ्यांनी या पिसाळलेल्या कोल्ह्याला मारून टाकल्याची माहिती समजतली आहे
पिसाळलेल्या कोल्ह्याच्या या हल्ल्यात संपत झिटे व ज्ञानदेव झिटे जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीगोंद्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत
याबाबत माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या भगत म्याडम व त्यांच्या सहकाऱ्यांनी पेडगाव कडे धाव घेतली परंतु तोपर्यत दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला करणाऱ्या या कोल्ह्याला लोकांनी यमसदणी धाडले होते
सदर घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की आज दुपारच्या वेळेस या कोल्ह्याने शेतात पाणी धरणाऱ्या झिटे यांना आधी चावा घेतला त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या झिटे नामक व्यक्तीला याच कोल्ह्याने चावा घेत जखमी केले त्यानंतर लोकांनी या कोल्ह्याला ठार मारले
लोकांच्या म्हणण्यानुसार काका पुतण्या यांना चावलेला कोल्हा एकच नसून दोन वेगवेगळे कोल्हे आहेत दोन्ही पिसाळलेले आहेत यातील एका कोल्ह्याला लोकांनी मारले असले तरी दुसरा कोल्हा पळून गेला आहे त्यामुळे अजूनही लोकांना धोका आहे त्यामुळे दुसऱ्या कोल्ह्याचा देखील तातडीने शोध घेण्याची मागणी नागरिक करत आहेत
अशा प्रकारे कोल्ह्याने चावा घेतल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण पसरले आहे
अशा प्रकारे कोल्ह्याने चावा घेतल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण पसरले आहे
बाप रे "याच्या" हल्ल्यात काका पुतणे गंभीर जखमी!श्रीगोंदा तालुक्यातील घटना!
Reviewed by Prashasak
on
जुलै १८, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
जुलै १८, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: