प्रशासक न्यूज,दि.१७जुलै२०२५
पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकाचा कारवाईचा धडाका अखंडितपणे सुरूच आहे कालच अवैध वाळू तस्करी व बेकायदेशीर दारुविक्रीवर कारवाई केल्यानंतर खाडे यांच्या पथकाने आज नगर शहरातील सुगंधी तंबाखू,आणि मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत २लाख ८हजार ५००रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत ४आरोपी जेरबंद केले आहेत
आज पोलीस उपाधीक्षक आपल्या पथकासह नगर शहरात कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत अवैध धंद्यांची माहिती घेत असतानाच गुप्त बातमीदारा मार्फत त्यांना माहिती मिळाली की,राज्यात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व ते तयार करण्यास बंदी असताना सुद्धा शहरातील काटवान खंडोबा रोड,डांगे मळा येथील विश्वास डांगे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये कैलास बबनराव मोकाटे रा.माळीवाडा आणि सुभाष गुलाबराव डागवाले हे दोघे त्या ठिकाणी सुगंधित तंबाखू आणि त्यापासून मावा तयार करत आहेत सदर माहिती समजल्यानंतर विशेष पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला असता तिथे इलेक्ट्रिक मशीनवर काही इसम सुगंधित तंबाखू पासून मावा तयार करत असल्याचे दिसून आले त्या ठिकाणी मावा तयार करणाऱ्या श्याम पांडुरंग मोकाटे,कैलास बबन मोकाटे,सुभाष गुलाबराव डागवाले,राहुल सुधीर पारधे सर्व रा नगर शहर या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले सदर ठिकाणाहून २४हजार रुपये किंमतीची ३६किलो सुगंधित तंबाखू,१९हजार रु किंमतीचा १९किलो तयार मावा,१लाख ६०हजार रु किंमतीचे मावा तयार करण्याचे २ मशीन,५हजार ५००रु किंमतीचे मावा तयार करण्याचे १ लहान मशीन असा एकूण २लाख ८हजार ५००रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला
सदर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे
खाडेंच्या पथकाकडून "हा" कारखाना उध्वस्त...दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करत ४ जण जेरबंद!
Reviewed by Prashasak
on
जुलै १७, २०२५
Rating:
Reviewed by Prashasak
on
जुलै १७, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: