'खाडेंचा' दणका.."त्या" पथकाची पुन्हा कारवाई...६२लाखांचा मुद्देमाल जप्त,१० आरोपींवर कारवाईचा बडगा!


प्रशासक न्यूज,दि.१६जुलै २०२५

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्यासाठी परीवेक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वात नेमलेल्या पथकाने आपल्या कारवाईत सातत्य ठेवत पुन्हा एक मोठी कारवाई केली आहे

मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गुटखा वाहतूक विक्रीवर,जुगार,मटका यासारख्या अवैध धंद्यांवर कारवाई केल्यानंतर विशेष पथकाने आपला मोर्चा आता बेकायदेशीर दारू विक्री आणी वाळू तस्करी याकडे वळवल्याचे दिसून येत आहे

दि१५जुलै आणि १६जुलै च्या मध्यरात्री खाडे यांच्या पथकाने जिल्ह्यातील कोपरगाव आणि नेवासा फाटा या ठिकाणी छापा टाकून बेकायदेशीर वाळू उपसा व वाळूची चोरटी वाहतूक करणारे ४डंपर,१ट्रॅक्टर,एक टेम्पो,वाळू उपसा करण्यासाठी लागणारे साहित्य,आणि वाळूचा साठा असा एकूण ६१लाख५८हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत जवळपास ८ वाळूतस्कर मालक चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे

तसेच पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव याठिकाणी एका हॉटेल वर आणि येडा चौकात बेकायदेशीर देशी विदेशी दारूचा साठा आणि अवैधरित्या सुरू असलेल्या दारू विक्रीवर कारवाई करत दोन जणांनविरोधात गुन्हा दाखल करत १६,६९०रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे

अश्या प्रकारे पोलीस अधीक्षकांच्या या विशेष पथकाने दोन दिवसात कोपरगाव,नेवासा आणि पाथर्डी या तीन तालुक्यात कारवाई करत एकूण ६१लाख ७४हजार ६९०रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत १० आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत

विशेष पथकाच्या या कारवायामुळे अवैध व्यवसाईकांचे धाबे दणाणले असून स्थानिक पोलिसांची मोठी गोची झाली आहे

सतत च्या कारवायामुळे पो उपाधीक्षक खाडे आणि त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे
'खाडेंचा' दणका.."त्या" पथकाची पुन्हा कारवाई...६२लाखांचा मुद्देमाल जप्त,१० आरोपींवर कारवाईचा बडगा!  'खाडेंचा' दणका.."त्या" पथकाची पुन्हा कारवाई...६२लाखांचा मुद्देमाल जप्त,१० आरोपींवर कारवाईचा बडगा! Reviewed by Prashasak on जुलै १६, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.