"आर्थिक" फसवणूक प्रकरणी सुरू असलेले उपोषण स्थगित...!! लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार - राजेंद्र म्हस्के!


प्रशासक न्यूज,दि.१५जुलै२०२५

इन्फिनाईट बीकॉन- सिसपे अशा वेगवेगळ्या नावाच्या कंपन्यांमार्फत मुख्य आरोपी नवनाथ अवताडे त्याच्या इतर संचालकांनी शेअर मार्केटच्या नावाखाली महाराष्ट्रातील असंख्य लोकांकडून पैसे गोळा करून मोठा आर्थिक घोटाळा केला असून यांच्या विरोधात श्रीगोंदा,नगर,पुणे येथील स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून यांना तातडीने अटक करून गुंतवणूकदारांना न्याय मिळावा याकरिता श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र म्हस्के उपोषणास बसले होते.भरपावसात त्यांचे उपोषण सुरु होते.श्रीगोंदा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी उपोषण स्थळी भेट दिली व म्हस्के यांनी उपोषण स्थगित केले.

दरम्यान राजेंद्र म्हस्के म्हणाले की,या दोन दिवसात माझ्याकडे पाचशे लोकांनी संपर्क केला आणि त्यांनी आपल्या गुंतवलेल्या पैशाची यादी माझ्याकडे दिली असून तो आकडा सुमारे १३ ते १४ कोटी पर्यंतचा आहे. हा आकडा वाढत जाणारा आहे. आजपर्यंत यामध्ये दहा आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपींना अटक केली असून बाकी आरोपी अजून मोकाट फिरत त्यांना तातडीने अटक करणे गरजेचे आहे. यामध्ये अजून सात मुख्य आरोपी वाढणार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल‌. या गुन्हेगारांच्या संपर्कात कोण कोण आहेत त्यांचे आर्थिक व्यवहार कोणा-कोणाशी होत आहे याची चौकशी होऊन त्यांच्या संपर्कात असणाऱ्यांना सह गुन्हेगार करून अटक करावेत तसेच जे गुन्हेगार सिद्ध झाले आहेत त्यांचे प्रॉपर्टी कोणी घेतली आहे,जो प्रॉपर्टी घेणारा आहे त्याला सुद्धा आरोपी करावे. अशाच प्रकारच्या ४० बोगस कंपन्या रजिस्टर असून कार्यरत आहेत ते सुद्धा याचप्रकारे फसवणूक करत असून या कंपन्या बंद होव्यात.या गुन्ह्याची व्याप्ती वाढणार आहे त्यामुळे या गुन्हाची तपासणी ई.डी.कडे जाण्याकरिता प्रयत्न करणार असून या संपूर्ण घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे तसेच या संपूर्ण प्रकल्प आर्थिक तज्ञ वकीलांची मदत घेऊन न्यायालयीन लढा लढणार आहे.व सर्व गुंतवणूकदारांना घेऊन पुढील दिशा ठरविणार आहे.

सोमवार दिनांक १४ जुलै रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण म्हस्के यांनी स्थगित केले. या उपोषण दरम्यान अनेक राजकीय व सामाजिक पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. या उपोषणात फसवणूक ग्रस्त गुंतवणूकदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
"आर्थिक" फसवणूक प्रकरणी सुरू असलेले उपोषण स्थगित...!! लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार - राजेंद्र म्हस्के! "आर्थिक" फसवणूक प्रकरणी सुरू असलेले उपोषण स्थगित...!!  लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार - राजेंद्र म्हस्के! Reviewed by Prashasak on जुलै १५, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.