श्रीगोंद्यात भाजपला बळकटी.. सरपंच,माजी सरपंच यांच्यासह अनेकांचा पक्षप्रवेश!


प्रशासक न्यूज,दि.१५जुलै २०२५

आज मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात श्रीगोंदा नगर विधानसभेतील प्रमुख नेत्यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते व आमदार विक्रम पाचपुते यांच्यासह तालुक्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीगोंदा खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुभाषराव काळाणे,बेलवंडीचे माजी सरपंच उत्तम(भाऊ)डाके तसेच तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय(अण्णा) निगडे, तांदळी दुमालाचे माजी सरपंच देविदास (तात्या) भोस व मढेवडगाव सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बंडू नामदेव मांडे यांचा आणि बेलवंडी व तांदळी दुमाला येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाल्याबाबत ची माहिती आमदार पाचपुते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली

भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी आज दिलेल्या वेळेनुसार मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष व आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत वरील मान्यवरांचा व अनेक कार्यकर्त्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला असून यावेळी जिल्ह्यातील व श्रीगोंदा नगर विधानसभेतील सर्व प्रमुख पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

*भविष्यात अनेक नेत्यांचे भाजप प्रवेश*
आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व नेते, कार्यकर्ते यांचे श्रीगोंदा नगर विधानसभेतील कार्यकर्त्यांच्या वतीने व जनतेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो व भविष्यातही असे अनेक नेत्यांचे प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झालेले आपल्याला दिसतील अशी प्रतिक्रिया आमदार विक्रम पाचपुते यांनी या पक्षप्रवेशानंतर दिली 
श्रीगोंद्यात भाजपला बळकटी.. सरपंच,माजी सरपंच यांच्यासह अनेकांचा पक्षप्रवेश! श्रीगोंद्यात भाजपला बळकटी.. सरपंच,माजी सरपंच यांच्यासह अनेकांचा पक्षप्रवेश! Reviewed by Prashasak on जुलै १५, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.