"त्या" घटनेचा छडा लागला.. तिघे जेरबंद!


प्रशासक न्यूज,दि.९जुलै२०२५

श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी येथे दि. १०मे ते ११मे २०२५ च्या दरम्यान रात्रीच्या वेळेस त्या गावातील राहिवासी पांडुरंग खामकर व त्यांचे शेजारी राहणारे शिवाजी कोरडकर हे घरी झोपलेले असताना काही अज्ञात चोरट्यानी या दोघांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम चोरून नेली होती याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता आता या चोरीचा छडा लावण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले असून या चोरीतील मुख्य साथीदार असणारा आरोपी फरार असला तरी तीन आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. तसेच सदर चोरीतील २०हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केली आहे

या चोरीच्या घटनेचा तपास करत असताना गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर चोरी ही दौंड येथील सराईत गुन्हेगारांनी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले त्यानंतर श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पो नि किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो उप नि सचिन लिमकर,पो ना संग्राम जाधव,पो कॉ संदीप शिरसाठ,पो कॉ संदीप आजबे,पो कॉ रवी जाधव,पो कॉ संदीप राऊत,पो कॉ अरुण पवार,म पो कॉ राणी व्यवहारे या पथकाने दौंड येथे जाऊन सापळा रचून मोठ्या शीताफीने चोरीतील आरोपी १)सूरज नितीन काळे वय.२२,रा.इंदिरानगर, दौंड,२)जंक्या शफया भोसले वय.२५..३)योगेश उर्फ शाकीर शफया भोसले वय.२६ दोघे रा.वेताळनगर,दौंड,जि. पुणे

या तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांचा एक फरार साथीदार याच्या मदतीने केल्याचे कबूल केले चोरी गेलेल्या मुद्देमाला बाबत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता चोरी केल्यानंतर मुख्य साथीदाराने आम्हाला या चोरीतील दिलेल्या रकमेपैकी काही रक्कम खर्च केली असून घरफोडीतील चोरीचे सोने हे त्यांच्या फरार मुख्य साथीदाराकडे असल्याचे सदर आरोपींनी पोलिसांना तपासा दरम्यान सांगितले चोरी केलेल्या रोख रकमेपैकी २०हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी आरोपी सूरज काळे याच्याकडून जप्त केली आहे मुख्य आरोपी फरार असून तीनही आरोपी पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदर गुन्ह्याच्या तांत्रिक तपासात सायबर सेलचे पो कॉ राहुल गुंडू आणि पो कॉ नितीन शिंदे यांनी मदत केली

*तीनही चोरटे सराईत गुन्हेगार*
पोलिसांनी ताब्यात घेतलेले तीनही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर दौंड पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे त्यामुळे या आरोपीकडून अजून काही गुन्ह्यांची उकलं होण्याची श्यक्यता आहे गुन्ह्याचा पुढील तपास पो उप नि सचिन लिमकर व पो कॉ अमित बर्डे हे करत आहेत





"त्या" घटनेचा छडा लागला.. तिघे जेरबंद! "त्या" घटनेचा छडा लागला.. तिघे जेरबंद! Reviewed by Prashasak on जुलै ०९, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.