प्रशासक न्यूज,दि.१७मे२०२५
बँकेतून रोकड घेऊन रस्त्याने जात असताना रोकड असलेली पिशवी हिसकावून तीन लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना काल दि.१६रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरातील मुख्य रहदारीच्या रस्त्यावर साईनाथ गॅस एजन्सी समोर घडली आहे
भररस्त्यात दिवसाढवळ्या एवढी मोठी रक्कम धाडसी पद्धतीने चोरून नेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे
या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी तात्काळ गुन्हे प्रगटीकरणं शाखेच्या(डीबी)कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही मिनिटात त्या ठिकाणी जाऊन सीसीटीव्ही तपासत चोरट्यांचा शोध घेतला मात्र चोरटे पसार झाले
या चोरीच्या घटनेबाबत काल रात्री उशिरा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नाना श्रीधर चव्हाण रा.घुगलवडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी चोरट्यानंविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे
सदर घटनेबाबत समजलेली माहिती अशी की फिर्यादी चव्हाण हे काल सकाळी पाऊने बारा वाजण्याच्या सुमारास बँकेतून काढलेली जवळपास तीन लाख रुपयांची रोकड एका पिशवीत ठेवून ती पिशवी दुचाकीच्या हॅन्डलला अडकवून आपल्या भाच्यासह दुचाकीवरून जात असतानाच साईनाथ गॅस एजन्सी परिसरात त्यांच्या समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमानी हॅन्डलला अडकवलेली तीन लाखांची रोकड असलेली पिशवी हिसकावून घेऊन तिथून धूम स्टाइलने पळ काढला अचानक घडलेल्या या प्रकारानंतर फिर्यादी चव्हाण यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला येऊन झाल्या प्रकारबाबत माहिती दिली पोलीस या चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत
भरदिवसा लुटले...श्रीगोंदा शहरातील प्रकार!
Reviewed by Prashasak
on
मे १६, २०२५
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: